शिर्डी, धुळे एसटी सेवा सुरू
By Admin | Updated: April 24, 2017 02:30 IST2017-04-24T02:30:54+5:302017-04-24T02:30:54+5:30
मुरुड आगारातील लांब पल्ल्याची धुळे व शिर्डी गाडी अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत होते. याच्या निषेधार्थ १५ एप्रिल रोजी मुरुड

शिर्डी, धुळे एसटी सेवा सुरू
आगरदांडा : मुरुड आगारातील लांब पल्ल्याची धुळे व शिर्डी गाडी अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल होत होते. याच्या निषेधार्थ १५ एप्रिल रोजी मुरुड तालुका पत्रकार संघ व प्रवासी संघटना मुरु ड यांच्या संयुक्त विद्यमाने मुरु ड आगारात उपोषण करण्यात आले होते. परंतु लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते. आगार व्यवस्थापक तेजस गायकवाड यांनी वरिष्ठ कार्यालयामार्फत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार विभाग नियंत्रक रायगड यांनी आदेश देताच शनिवारपासून शिर्डी व धुळे गाड्या पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.
मुरु ड आगारात सकाळी सुटणाऱ्या मुरु ड-शिर्डी गाडीचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व मुरु ड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मंगेश दांडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. (वार्ताहर)