पेण - आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयात गेली असता बुधवारी काही मिनिटांतच अचानकपणे बेपत्ता झालेली पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील चार वर्षाची चिमुकली किशोरी किरण महालकर अखेर ४८ तासांनी डोंगरावरील झाडाखाली सापडली.
२०० जणांचा जमाव आणि पोलिसांच्या सर्च ऑपरेशनमुळे भीतीपोटी अपहरणकर्त्याने मुलीला झाडाखाली बसवून ठेवून पळ काढला. शोधमोहिमेत सकाळी परिसरात मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून सीआर जवान त्या दिशेने गेला असता मुलगी घाबरलेल्या अवस्थेत सापडली आणि सर्वानी सुटकेचा निःश्वास सोडला. तिला वडिलांकडे सोपवताच ती त्यांना घट्ट बिलगली आणि चेहऱ्यावर हसू फुलले.
कुटुंबीयांनी मानले पोलिस यंत्रणेसह ग्रामस्थांचे आभारमुलीला आदिवासी वाडीत नेऊन तिच्या पालकांसह वैद्यकीय तपासणीसाठी पेण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शासकीय रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करून अखेर तिची रवानगी दुपारी घराकडे करण्यात आली. कुटुंबीयांनी धाडसी पोलिस यंत्रणा विशेषतः जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संपूर्ण यंत्रणा आणि सामाजिक सेवाभावी संस्था मावळा प्रतिष्ठान, हेटवणे पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, तरुणांच्या एकजुटीचे आभार मानले.मुलीची प्रकृती ठीक असून, उपचारानंतर ती पालकांसोबत घरी सुखरूप आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप बागुल तपास करीत आहेत.
Web Summary : A four-year-old girl, missing for 48 hours in Pen, was found in the forest after her cries were heard. Search teams discovered her scared under a tree, abandoned by her abductor. Reunited with her father, she smiled, bringing relief to all. She is now safe at home.
Web Summary : पेन में 48 घंटे से लापता चार साल की बच्ची रोती हुई जंगल में मिली। खोज दल ने उसे एक पेड़ के नीचे डरी हुई हालत में पाया, जिसे अपहरणकर्ता छोड़ गया था। पिता से मिलते ही वह मुस्कुराई, जिससे सभी को राहत मिली। वह अब घर पर सुरक्षित है।