शहरं
Join us  
Trending Stories
1
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
2
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
3
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
4
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
5
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
6
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
7
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
8
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
9
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
10
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
11
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
12
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
13
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
14
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
15
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
16
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
17
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
18
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
19
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
20
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
Daily Top 2Weekly Top 5

नाटक, संगीत, साहित्याचा व्यासंग असणारा लोकनेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 02:10 IST

sharad pawar birthday : एकाच माणसाला असंख्य गोष्टींंची आवड असावी असे एकाद्या व्यक्तीकडे पाहायला मिळते. त्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरद पवार!

- आमदार ॲड. आशिष शेलार राजकारणासोबत नाटक, गीत-संगीत, साहित्य, कला, क्रीडा या विषयांचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे.  असा क्रिकेटचा कोणता सामना नसेल जो त्यांना ज्ञात नाही, असे होत नाही. तसेच महाराष्ट्रातील  साहित्य संमेलन व संमेलनांचे अध्यक्ष, त्यांची भाषणे याबाबतही ते भरभरून बोलू शकतात. मराठी, हिंदी, इंग्रजीमधील नामवंत साहित्यिकांपासून अलीकडे नव्याने लिहिणाऱ्या लेखक, कवींच्या साहित्यापर्यंत  त्यांचे वाचन आहे.  त्यांना भेटायला गेल्यानंतर नवनवीन पुस्तकांची माहिती मिळत राहते.एका भेटीत मी त्यांना म्हटले की, पुस्तकांचे पहिले गाव सुरू होताच भिलारला तुम्ही लगेच दुसऱ्याच दिवशी भेट दिल्याचे वर्तमानपत्रात वाचले. त्यावर ते म्हणाले, हो. काही पुस्तकेसुद्धा दोन दिवसांत मी पाठवून देणार आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमने वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर टीमसह आम्ही मा. शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. त्या वेळी पूनम राऊत हिने आपल्याकडे मुंबईत घर नाही. आहे ते खूप लहान आहे, अशी खंत व्यक्त केली. याबाबत सरकारला तिने विनंतीही केली. या भेटीनंतर तीन दिवसांत मला एकदा पुण्याहून पवार साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, मी एका विकासकासोबत आहे. पूनम राऊत राहते त्या कांदिवलीमध्ये त्यांचे बांधकाम सुरू आहे. मी त्या विकासकाशी चर्चा केली आहे. काही गोष्टींंची तरतूद आपण करू. तुम्ही पुढील समन्वय साधा. महिनाभरात घर तिला मिळेल, असे प्रयत्न करू.अशा पद्धतीने संवेदनशीलपणे पाहणारे त्यांचे नेतृत्व आहे. अशा अनेक घटना सांगता येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे जागतिक कीर्तीचे नेतृत्व आज मा. पवार यांचा आदराने उल्लेख करतात. ते बारामतीला जातात त्यावर  अनेक गोष्टींंचे महत्त्व विशद होतेच. संघर्षातून पुढे आलेले शरद पवार यांचे नेतृत्व आहे. आजही त्यांचा कामाचा धडाका पाहिला की आश्चर्यचकित व्हायला होते. एवढे सगळे व्याप, राजकारण, समाजकारण, दौरे, भेटी, वाचन सगळे सांभाळणारे पवारसाहेब एवढ्या सगळ्यात वेळेच्या बाबतीतही काटेकोर आहेत. कोणत्याही कार्यक्रमाला त्यांनी दिलेल्या वेळेवरच ते उपस्थितीत होतात. तसेच रोजच्या भेटीगाठीच्या शेड्यूलमध्ये त्यांनी नियोजित केलेल्या वेळेतच त्यांची भेट होते व ती संपते. कदाचित त्यावरून तर त्यांनी राष्ट्रवादीला घड्याळाचे चिन्ह दिले नाही ना? असे वाटते. पण त्यांचा हा गुण त्यांच्या पक्षात किती जणांनी आत्मसात केला, हा संशोधनाचा विषय असू शकतो.वेळेचे पक्के असणाऱ्या मा. शरद पवार यांच्याकडे राजकारणात ही वेळ साधण्याची कला विलक्षण आहे. राजकारणात टायमिंगला महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांनी टायमिंग साधलेपण आणि अनेकवेळा अनेकांचे चुकवलेपण! असो. ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने खूप शुभेच्छा.  पन्नास वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत पवारांच्या कामातील सातत्याने कायम राहिले, त्याशिवाय कदाचित त्यांना चैनही पडत नसावे. पवार, कुठेही जाऊ शकतात, असे विधान राजकारणात अनेकदा केले जाते. मात्र, पवारांनी कायम संविधानाला आधार मानूनच वाटचाल केली आहे. लोककल्याणाची भावना आणि दृष्टीसमोर ठेऊनच ते काम करत राहिले आहेत. निवडणुका येतात-जातात, पण योग्य व्यक्तीकडे उच्चपदाची जबाबदारी असेल, तरच लोककल्याणाची कामे होतात. उच्च पद ही पवारांची गरज नाही, तर आपल्या अनुभव, कर्तबगारीने पदाची महत्ता वाढविणारे असे पवार साहेबांचे व्यक्तिमत्त्व आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार