शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

दासगावमधील टपाल कार्यालयातील सेवा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:18 PM

खंडित इंटरनेट सेवेचा फटका

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव गावातील पोस्ट कार्यालय गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधेमुळे त्रस्त आहे. चौपदरीकरण कामात वारंवार इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांची लाइन तुटत असल्याचे कारण दिले जात असल्याने पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि ग्राहक देखील हैराण झाले आहेत. याबाबत कठोर कारवाई केली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.महाडजवळील दासगाव हे एक मुख्य गाव आहे. या गावात असलेल्या पोस्ट कार्यालयातील सुविधेचा परिसरातील गावांना फायदा होत आहे. टपाल पाठवणे, आर्थिक गुंतवणूक, विमा काढणे आदी सुविधा उपलब्ध असल्याने दासगाव पोस्ट कार्यालयात कायम गर्दी असते. मात्र, गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून याठिकाणी इंटरनेट सुविधेचे तीनतेरा वाजत आहेत. एकीकडे शासन सर्व व्यवहार आॅनलाइन पद्धतीने करण्याकडे आग्रह धरत असताना दुसरीकडे मात्र इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडवला आहे. ग्रामीण भागात आणि सर्व शासकीय कार्यालयात भारत संचार निगम लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीचे नेट वापरले जाते. मात्र, शासनाच्या या इंटरनेट सुविधेचे महामार्ग चौपदरीकरण कामाने वाट लावली आहे. यामुळे आॅनलाइन कामे आॅफलाइन झाली आहेत.दासगावमधील टपाल कार्यालयात वीर, दाभोळ, कोकरे, दासगाव, सापे या गावातील लोकांची कामे होतात. टपाल सेवा, पासपोर्ट, बचत खात्यांचे व्यवहार आदी सुविधा खंडित इंटरनेटमुळे ठप्प झाली आहेत. याबाबत दासगाव टपाल कार्यालयाने वारंवार तक्र ारी केल्या. मात्र, याकडे भारत संचार निगम लिमिटेडचे महाड कार्यालय दुर्लक्ष करत आहे. वारंवार तोडल्या जाणाºया लाइनबाबत साधी कारवाई देखील झालेली नाही. यामुळे दासगावमधील टपाल कार्यालयाचे कर्मचारी आणि टपाल कार्यालयात येणारे नागरिक देखील या सेवेने हैराण झाले आहेत. खेडोपाड्यातून येणारे नागरिक खंडित इंटरनेट सुविधेमुळे वारंवार फेºया मारत आहेत. टपाल कार्यालयात खासगी इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने केवळ बीएसएनएलच्या लाइनवरच अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, बीएसएनएलचे अधिकारी याबाबत गंभीरपणे कार्यवाही करत नाहीत.महामार्ग कामात इंटरनेट सुविधा खंडित होत आहे. लवकरच याबाबत कार्यवाही करून इंटरनेट सुविधा पूर्ववत केली जाईल.- बी.पी. रावत, जनरल मॅनेजर, बीएसएनएलदासगाव टपाल कार्यालयात गेल्या वर्षभरापासून इंटरनेट सुविधा खंडित होत आहे, यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, टपाल ग्राहकांच्या संतापाला आम्हाला तोंड द्यावे लागत आहे- के. आर. शिलवंत,पोस्ट मास्तर, दासगावदासगावमधील बीएसएनएलचे एक्सचेंज वहूरमध्ये स्थलांतर केल्यापासून दासगावमध्ये इंटरनेट सुविधा ठप्प झाली आहे. यामुळे पोस्ट आॅफिसमधील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे, ही सुविधा लवकर पूर्ववत न झाल्यास नागरिक रस्त्यावर उतरणार.- दिलीप उकिर्डे,सरपंच दासगाव

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसRaigadरायगड