एनएमएमटीच्या अपघातात एक गंभीर

By Admin | Updated: January 9, 2016 02:15 IST2016-01-09T02:15:53+5:302016-01-09T02:15:53+5:30

एनएमएमटी बस आणि सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकच्या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

A serious accident in NMMT | एनएमएमटीच्या अपघातात एक गंभीर

एनएमएमटीच्या अपघातात एक गंभीर

चिरनेर : एनएमएमटी बस आणि सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकच्या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. शुक्रवार सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फुंडे महाविद्यालयाजवळ हा अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून, बसमध्ये गर्दी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघाताची नोंद उरण पोलीस ठाण्यात आहे.
घणसोली ते उरण ही ३९ नंबरची बस (एमएच-४३ एच-५२१४) प्रकाश तातोबा बोंडे हा चालक उरणकडे घेऊन जात असताना फुंडे महाविद्यालयाजवळ सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करताना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: A serious accident in NMMT