शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

बनावट खतांची विक्री, शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 4:36 AM

राज्यात काही ठिकाणी मूळ सेंद्रिय खताची नक्कल करून खताच्या बॅगवर चुकीचा मजकूर छापून ते खत विक्र ी करीत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. डी.ए.पी. व पोटॅश या मूळ खताच्या गोणीची नक्कल करून आॅर्गनिक डी.ए.पी. किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट नावाने विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अलिबाग -  राज्यात काही ठिकाणी मूळ सेंद्रिय खताची नक्कल करून खताच्या बॅगवर चुकीचा मजकूर छापून ते खत विक्र ी करीत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. डी.ए.पी. व पोटॅश या मूळ खताच्या गोणीची नक्कल करून आॅर्गनिक डी.ए.पी. किंवा नॅचरल पोटॅश अशा बनावट नावाने विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे शेतकºयांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची खत विक्री ही खत नियंत्रण आदेश १९८५ या कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे. या प्रकरणी कृषी विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. ज्या ठिकाणी असा प्रकार निदर्शनास येत आहे त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.या बनावट खतविक्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी डी.ए.पी व पालाशयुक्त खते खरेदी करताना दक्षता घ्यावी. बॅगेवरील मजकुराची शहानिशा करावी. दिशाभूल करून विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ जवळच्या पंचायत समिती, कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.केंद्र आणि राज्य शासनाने मंजूर केलेल्या खताच्या ग्रेडसारखी दिसणारी, अनुकरण, नक्कल केलेल्या खतांची खरेदी करण्यात येऊ नये. खताच्या बॅगवर त्यामध्ये असणारे रासायनिक घटक, मूलद्रव्याचे प्रमाण नमूद केलेले असणे बंधनकारक आहे. त्याची खातरजमा करण्यात यावी. उदा. डी.ए.पी. रासायनिक खतामध्ये नत्राचे प्रमाण १८ टक्के व स्फुरदचे प्रमाण ४६ टक्के असेल, तसा मजकूर बॅगवर छापलेला असल्याची खात्री करावी. खताच्या बॅगवर लिहिलेला मजकूर नीट वाचून, खात्री करून विक्रेत्यांशी चर्चा करून शंका समाधान झाल्यानंतरच खत खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.१ हजार १३१ निरीक्षक नियुक्त१राज्यात कृषी निविष्ठा गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित असून या कामासाठी राज्यात ११३१ खते, बियाणे, कीटकनाशके निरीक्षकांची नेमणूक केली आहे.२सद्यस्थितीत खरीप हंगामास सुरुवात झाली असून पिकासाठी रासायनिक खते खरेदी करताना अधिकृत परवानाधारक विक्र ी केंद्रातून व केंद्र व राज्य शासनाने मंजूर केलेल्या गुणवत्ता व दर्जाची हमी देणाºया अधिकृत ग्रेडच्या खतखरेदीस प्राधान्य द्यावे.३कोणत्याही परिस्थितीत विनापरवाना विक्र ी होत असलेल्या ठिकाणाहून, दूरध्वनीवरून संपर्क साधून विक्र ी करणारे विक्रे ते, शेतकºयांना घरपोच खत देणारे अनधिकृत विक्रे ते यांच्याकडून खतखरेदी करू नये. खरेदी केलेल्या खताची रीतसर पावती घेण्यात यावी व ती पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी.४खतात भेसळ असल्याची शंका दूर करण्यासाठी खतांची पाकिटे व गोणी सीलबंद असल्याची खात्री करावी, अशा सूचना कृषी विभागाने शेतकºयांना दिल्या आहेत.

टॅग्स :newsबातम्या