जे स डब्ल्युच्या जहाजातून अडकलेल्यांना काढण्यास सर्च ऑपरेशन सुरू; कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरने सुरू केले ऑपरेशन
By राजेश भोस्तेकर | Updated: July 26, 2024 13:47 IST2024-07-26T13:47:34+5:302024-07-26T13:47:56+5:30
रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

जे स डब्ल्युच्या जहाजातून अडकलेल्यांना काढण्यास सर्च ऑपरेशन सुरू; कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरने सुरू केले ऑपरेशन
अलिबाग : अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात गुरुवारी २५ जुलै रोजी अलिबाग येथून जयगड पोर्टकडे जे एस डब्ल्यू कंपनीचे मालवाहू जहाज भरकटले होते. नांगर टाकून हे जहाज थांबवले होते. साधारण १८ तासाहून अधिक काळ यात १४ खलाशी अडकले होती. या खलाशीना सुखरूप काढण्याचे सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टर चोपरच्या सहाय्याने हे ऑपरेशन सुरू झाले आहे.
रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. समुद्रही खवळलेला असल्याने अलिबाग येथून जयगड पोर्टवर माल घेऊन निघालेली जे एस डब्लू कंपनीची मालवाहू बार्ज भरकटल्याने कुलाबा किल्ल्याजवळ अडकला आहे. यात कोणतीही दुर्घटना घडलेली नसली तरी बार्ज आणि त्यातील अडकलेल्या १४ जणांना काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, कोस्ट गार्ड आणि कंपनी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू केले आहेत. बोटीचा नांगर टाकून बोट ही समुद्रात थांबविण्यात आलेली होती.
जहाज मधील १४ खलाशी हे १८ तासाहून अधिक काळ अडकले होते. सकाळी नऊ वाजल्यानंतर कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरने सर्च ऑपरेशन सुरू करून खलाशी यांना सुखरूप काढण्यात येत आहे. खलाशी याना समुद्र किनारी आणल्यानंतर कंपनी प्रशासनातर्फे पाणी, खाण्याच्या वस्तू दिल्या जात आहे. जिल्हा पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन ही या सर्च ऑपरेशन मध्ये सहभागी झाले आहे.
गोराई बीचवर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला जीवरक्षकांनी वाचवले pic.twitter.com/AfNk7clRKr
— Lokmat (@lokmat) July 26, 2024