‘चलाख’ दरोडेखोर जेरबंद
By Admin | Updated: May 10, 2016 02:06 IST2016-05-10T02:06:49+5:302016-05-10T02:06:49+5:30
दरोडा टाकताना महिलांच्या अंगावरील मंगळसूत्रे न खेचणे, त्यांना कोणताही धक्का न लावणे, अशी काही ‘पथ्ये’ पाळून घरांमध्ये घुसून गोळीबार करून जबरी चोऱ्या करणाऱ्या देवाशीष तारापद

‘चलाख’ दरोडेखोर जेरबंद
ठाणे : दरोडा टाकताना महिलांच्या अंगावरील मंगळसूत्रे न खेचणे, त्यांना कोणताही धक्का न लावणे, अशी काही ‘पथ्ये’ पाळून घरांमध्ये घुसून गोळीबार करून जबरी चोऱ्या करणाऱ्या देवाशीष तारापद बंक ऊर्फ आशीष संदीप गुनगुन ऊर्फआशीष दिवाकर गांगुली (३९, रा. टिटवाळा) आणि शंकर ऊर्फ रमेश कांचन दास या दोघांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून अमेरिकन आणि इटली बनावटीच्या दोन रिव्हॉल्व्हर, दोन गावठी कट्टे आणि दोन बनावट पिस्तूल अशी सहा रिव्हॉल्व्हर, पोलिसांच्या बेड्या, तीन बंजर, तीन कोयते, एक कुऱ्हाड या शस्त्रांसह एक मोटारसायकल, हॅण्डग्लोज आणि चेहऱ्याचा मास्क अशी दरोड्याची सामग्रीही जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी दिली. त्याला १३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अभय
कुरुं दकर यांच्या पथकाने त्याला ८ मे रोजी टिटवाळ्यातून अटक केली. २००७ पासूनच घरफोड्या करणाऱ्या देवाशीषवर ठाणे ग्रामीणच्या टिटवाळा, मुरबाड, कुळगाव, वांगणी, मीरा रोड परिसरात चोरीचे सहा, रायगड जिल्ह्णातील नेरळ, कर्जतमधील तीन, पालघर जिल्ह्णातील सफाळ्यात एक तर गुजरातमधील डुंगरी, बलसाड, नवसारी या तीन अशा १३ जबरी चोरीच्या गुन्ह्णांची नोंद आहे.
मूळच्या पश्चिम बंगालमधील देवाशीषकडे वेगवेगळी तीन पॅनकार्ड मिळाली. त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.