महाडजवळ स्कूल बस-कारची धडक
By Admin | Updated: July 28, 2015 23:56 IST2015-07-28T23:56:00+5:302015-07-28T23:56:00+5:30
मुंबई - गोवा महामार्गावर पावसाळा सुरू झाल्यापासून महाड हद्दीत अनेक अपघात झाले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर

महाडजवळ स्कूल बस-कारची धडक
दासगाव : मुंबई - गोवा महामार्गावर पावसाळा सुरू झाल्यापासून महाड हद्दीत अनेक अपघात झाले. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्या हद्दीत एका स्कूल बसला समोरून स्वीफ्ट कारने जोराची धडक दिली. यामध्ये तीन जण जखमी झाले.
फजंदार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वहूर शाळेची स्कूल बस महाडमधून शाळेतील मुले आणण्यासाठी निघाली असता केंबुर्ली गावचे हद्दीत रुची हॉटेलसमोर महाड ते माणगांव भरधाव वेगाने जाणारी स्वीफ्ट कार विरुध्द दिशेला येऊन बसवर धडकली. या अपघातामध्ये बस चालक कृष्णा महादेव डावरुंग (६७, रा. वहूर), बसमधील प्रवासी शशिकांत गोविंद गजमल (२९, रा. वहूर) तर स्वीफ्ट कार चालक विठ्ठल नारायण कोळेकर (५५, रा. बोरर्ली श्रीवर्धन) असे तीन जण जखमी झाले. बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी विठ्ठल कोळेकर यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)