शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आक्षी येथील शिलालेखाचे जतन करा; ग्रामस्थांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:45 IST

मराठीतील देशातील पहिला शिलालेख; ग्रामपंचायतीमार्फत पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

- निखिल म्हात्रे अलिबाग : तालुक्यातील आक्षी येथे असलेल्या देशातील मराठी भाषेतील पहिल्या शिलालेखाचे जतन करण्यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने शिलालेख आजही रस्त्याच्या कडेला इतिहासाची साक्ष देत आहे. शिलालेखाला सुरक्षित ठिकाणी ठेवून त्याचे जतन करण्यास परवानगी मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे; परंतु कोणत्याच यंत्रणेला या शिलालेखाबाबत अभिमान नसल्याने नाराजीचा सूर आहे.आक्षी गावामध्ये दोन शिलालेख आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे शिलालेख उघड्यावर असल्याने त्यांनी अनेक उन्हाळे व पावसाळे पाहिले आहेत. शिलालेखावरील मजकूर अस्पष्ट होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्न करीत आहे. या शिलालेखाचा अभ्यास करण्यासाठी विविध ठिकाणाहून अभ्यासक येत असतात. मात्र, त्यांना रस्त्यावरच उभे राहून या शिलालेखाचे परीक्षण करावे लागत आहे. रस्त्यावर सतत असणाºया रहदारीमुळे अभ्यासकांना अभ्यास करताना अडचणी येत आहेत. आक्षी स्तंभलेख ते समुद्रकिनाºयावरील जाणाºया रस्त्याच्या बाजूलाच इलेक्ट्रिकच्या डीपीखाली उभा आहे. तेथे जागाही अपुरी असल्याने त्या परिसरात ग्रामपंचायतीला सुशोभीकरणही करता येत नाही. मात्र, या शिलालेखाचा परिसर नेहमीच ग्रामपंचायत प्रशासनाकडून स्वच्छ ठेवण्यात येत आहे. याबरोबरच शिलालेखाची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहेत. याबाबत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.सुशोभीकरणाची गरजमराठी भाषेतील पहिला शिलालेख असल्याने शासनाने त्याचे संवर्धन करण्यासाठी परवानगी देणे गरजेचे आहे.शासनाने परवानगी दिल्यास या शिलालेखाचे तत्काळ सुशोभीकरण करण्यात येईल. त्यामुळे शासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन सुशोभीकरणाला परवानगी द्यावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.आक्षी गावातील शिलालेख हे मराठी भाषेतील पहिले शिलालेख असल्याने त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्याच्या सुशोभीकरणासाठी साईनगर परिसरात दगडांचे कोरीव काम करून बांधकाम करण्यात आले आहे.पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाली तर या शिलालेखाचे जतन करणे शक्य होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत सुशोभीकरणाची परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जिल्हा परिषद रायगड, पुरातत्त्व विभागाकडे लोखी पत्राद्वारे मागणी केली आहे, असे ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार वाळंज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.