संजय भोईर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By Admin | Updated: May 29, 2016 03:04 IST2016-05-29T03:04:31+5:302016-05-29T03:04:31+5:30

पेण तालुक्यातील जांभूळटेप येथील पेण पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा माजी सभापती संजय धाया भोईर यांचे गांधे - चोळे आणि शिहू - आटीवली नळ पाणीपुरवठा योजनेच्या

Sanjay Bhouir's anticipatory bail rejected | संजय भोईर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

संजय भोईर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नागोठणे : पेण तालुक्यातील जांभूळटेप येथील पेण पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा माजी सभापती संजय धाया भोईर यांचे गांधे - चोळे आणि शिहू - आटीवली नळ पाणीपुरवठा योजनेच्या भ्रष्टाचारात नाव पुढे आल्याने संभाव्य अटक टाळण्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अलिबागच्या जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाची सुनावणी होऊन १८ मे च्या आदेशान्वये अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांनी नागोठणे पोलिसांचा रिपोर्ट तसेच कागदपत्रांचे अवलोकन करून भोईर यांचा अर्ज फेटाळला आहे.
विभागातील शिहू ग्रामपंचायत हद्दीतील गांधे - चोळे आणि शिहू - आटीवली या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी आठ लाखाचा निधी मंजूर झाला होता. हे काम काराव, गडब येथील काळंबादेवी मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले होते. हे काम झालेले नसतानाही प्रत्यक्षात काम पूर्ण झाले असल्याबाबतचा निधी संबंधित संस्थेला अदा करण्यात आला होता. या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्यात २८ मे २०१५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर या प्रकरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे तीन अधिकारी तसेच अनंत कुथे आणि घनश्याम कुथे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. (वार्ताहर)

चौकशीत संजय भोईर यांचा या प्रकरणात हात असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे भोईर यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता, मात्र अतिरिक्त जिल्हा न्यायमूर्ती पेठकर यांनी त्यांचा अर्ज फेटाळला आहे.

Web Title: Sanjay Bhouir's anticipatory bail rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.