शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
3
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
4
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
5
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
6
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
7
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
8
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
9
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
10
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
11
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
12
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
13
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
14
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
15
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
16
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
17
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
18
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
19
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
20
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?

१२ कोटींचे सांबरकुंड धरण दोन हजार कोटींवर; ४० वर्षे अलिबागकरांना फक्त आश्वासनांचे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 07:57 IST

अजूनही हे धरण कागदावरच असून आगामी विधानसभा निवडणुकांत हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता

अलिबाग : गेली चाळीस वर्षे प्रत्येक निवडणुकीत प्रस्तावित सांबरकुंड धरणाच्या ‘आश्वासना’चे पाणी अलिबागकरांना पाजले जात असून सुरुवातीला बारा कोटींच्या खर्चाचे हे धरण आता दोन हजार कोंटींच्या घरात पोहोचले आहे. अजूनही हे धरण कागदावरच असून आगामी विधानसभा निवडणुकांत हा मुद्दा पुन्हा गाजण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज, महान परिसरात सांबरकुंड मध्यम प्रकल्प प्रस्तावित आहे. रायगड जिल्ह्यात एकूण २८ धरणे असून त्यांची जलसाठा साठवणूक क्षमता ६५ दलघमी इतकी आहे. असली तरी अनेक धरणे जुनी झाल्याने गाळात रुतली आहेत. दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील लोकसंख्या आता २६ लाखांवर पोहोचल्याने जलसाठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे नवीन धरणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरू लागली आहे. अलिबागकरांची तहान भागवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या सांबरकुंड धरणाची मागणी निवडणुका आल्या की चर्चेत येते. मुळात हे धरण भूसंपादन प्रक्रियेतच अडकून पडले आहे. मागील पाच वर्षांत दोन सरकारे आली. त्यांनीही ही प्रक्रिया पूर्ण करून तातडीने धरण पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण दोन्ही सरकारांकडून निराशा पदरी पडल्याचे मत व्यक्त होत आहे.

सांबरकुंड धरणाबाबत शेतकऱ्यांसोबत अनेक बैठका झाल्या. धरणग्रस्तांचा धरणाला विरोध नाही. मात्र, वाढीव मोबदला हवा हा मुद्दा आहे. त्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे - मुकेश चव्हाण, प्रांताधिकारी, अलिबाग.

धरणग्रस्तांच्या मागणीवर तोडगा निघेना

सांबरकुंड धरणग्रस्त यांना मिळणारा मोबदला २०१३ च्या निवड्यानुसार मंजूर झाला असून तो घेण्यास धरणग्रस्तांचा विरोध आहे. 

नव्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र या मागणीचा प्रस्ताव हा शासन दरबारी धूळखात पडून आहे. 

टॅग्स :alibaugअलिबागDamधरण