रोह्यात होतेय गांजाची विक्री
By Admin | Updated: August 6, 2015 03:00 IST2015-08-06T03:00:38+5:302015-08-06T03:00:38+5:30
रोहा-धाटाव एमआयडीसी बायपास रोडलगत दर्गा मैदानजवळील एका हॉटेलशेजारी व फिरोज टॉकीज परिसरात, एसटी बस स्थानक परिसरात बेकायदा गांजाची छुप्या पद्धतीने

रोह्यात होतेय गांजाची विक्री
रोहा : रोहा-धाटाव एमआयडीसी बायपास रोडलगत दर्गा मैदानजवळील एका हॉटेलशेजारी व फिरोज टॉकीज परिसरात, एसटी बस स्थानक परिसरात बेकायदा गांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत आहे. अनेक गावांतील तरुण पिढीला गांजाच्या सेवनाने व्यसनाधीन केले आहे. या बेकायदा गांजाच्या विक्रीवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी रोहेकर नागरिकांनी केली आहे.
शहराच्या मुख्य ठिकाणी सर्रासपणे गांजा विक्र ी होत असल्याने रात्रीच्या वेळी नशा करणारी तरुण मंडळी म्हाडा कॉलनीजवळील सातरस्ता, हनुमान टेकडी रोड, रेल्वे स्टेशन, पालदाड पूल व कुंडलिका नदीकाठी बसून हुक्का पार्टीचे आयोजन करणे, रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, आरडाओरडा करून शहरातील शांतता भंग करणे असे नानाविध प्रकार घडत असल्याने यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक अल्ताफ चोरढेकर यांच्यासह नागरिकांनी केली आहे.