साजगाव सरपंचपदी मंगल शेलार
By Admin | Updated: June 15, 2016 01:02 IST2016-06-15T01:02:26+5:302016-06-15T01:02:26+5:30
तालुक्यातील साऱ्यांचे लक्ष राहिलेल्या साजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी १३ जून रोजी निवडणूक होऊन सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्याने या आरक्षित जागेवर

साजगाव सरपंचपदी मंगल शेलार
खालापूर : तालुक्यातील साऱ्यांचे लक्ष राहिलेल्या साजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी १३ जून रोजी निवडणूक होऊन सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्याने या आरक्षित जागेवर शिवसेनेच्या मंगल शेलार यांना नशिबाने साथ दिल्याने दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीच्या खेळात सेनेने बाजी मारली. शिवसेनेच्या मंगल शेलार या राष्ट्रवादीच्या पुष्पा भगत यांच्यावर मात करत सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
मावळत्या सरपंच सविता भांडीलकर यांचे सरपंच आणि सदस्य पद कोकण आयुक्तांनी रद्द केल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. राष्ट्रवादीकडे प्रत्येक ५ सदस्य व शिवसेनेचे ५ सदस्य असल्याने निवडणुकीतील निकालाची उत्सुकता वाढली होती.परंतु समसमान मते पडल्याने अखेर चिठ्ठीखेळ सुरू झाला आणि शिवसेनेच्या मंगल शेलार यांना नशिबाने साथ दिली. त्यांनी विजय संपादन केल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. उपस्थित मान्यवरांनी मंगल शेलार यांचे अभिनंदन केले. माजी सरपंच भांडीलकर यांनी सरपंचपदाचा गैरवापर करून दोन कंपन्यांना ना हरकत दाखले दिल्याची तक्रार झाल्यानंतर कोकण आयुक्तांनी चौकशी करून भांडीलकर यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द केल्याने ही निवडणूक घेण्यात आली. (वार्ताहर)
ग्रामपंचायत निवडणूक
साजगाव ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेने ६ व राष्ट्रवादीने ५ जागा जिंकल्या होत्या. शिवसेनेतील अंतर्गत कराराप्रमाणे संगीता जाधव यांनी सरपंचपदाचा दीड वर्षानंतर राजीनामा दिल्यानंतर सरपंच पदाच्या निवडणुकीत सेनेकडे बहुमत असतानाही अनपेक्षितपणे राष्ट्रवादीच्या सविता भांडीलकर सरपंचपदी निवडून आल्या होत्या. तर शिवसेनेकडे उपसरपंच पदासह बहुमत असल्याने ती जागा सेनेकडे गेली होती.