उरणचे माजी राजिप सदस्य बाजीराव परदेशी यांचे दुःखद निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2023 16:17 IST2023-08-24T16:16:25+5:302023-08-24T16:17:43+5:30
आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उरणचे माजी राजिप सदस्य बाजीराव परदेशी यांचे दुःखद निधन
उरण : चिरनेर येथील रहिवासी कॉंग्रेसचे राजिप पक्ष प्रतोद तथा माजी जिप सदस्य बाजीराव परदेशी (५८) यांचे गुरुवारी ( २४) उपचारादरम्यान सकाळी इस्पितळात दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
चिरनेर ग्रामपंचायतीचे सदस्य ते सरपंच अशा राजकीय प्रवासानंतर त्यांनी उरण तालुक्यातील कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष पदाचा धुराही काही काळ सांभाळली होती. त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून बाजीराव परदेशी निवडून आले होते.
काँग्रेसने त्यांच्यावर राजिप पक्ष प्रतोद पदाचीही जबाबदारी सोपवली होती.चार दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांचे रुग्णालयातच दुःखद निधन झाले. बाजीराव परदेशी यांच्या आकस्मिक निधनामुळे मात्र परिसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.