शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

त्याग भूमिपुत्रांचा; लाभ मात्र दुसऱ्यांंना, शरद पवार यांनी जेएनपीटीला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 23:26 IST

त्याग करायचा येथील भूमिपुत्रांनी आणि त्याचा लाभ घ्यायचा दुस-याने, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेएनपीटीला आज स्पष्टपणे सुनावले.

उरण : त्याग करायचा येथील भूमिपुत्रांनी आणि त्याचा लाभ घ्यायचा दुस-याने, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेएनपीटीला आज स्पष्टपणे सुनावले. उरण येथील वीर वाजेकर महाविद्यालयाच्या नवीन इमारतींचे उद्घाटन शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या कार्यक्रमात ते बोलत होते.वीर वाजेकर महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त नवीन प्रशासकीय इमारत, सायन्स इमारत, मुलींचे वसतिगृह, ग्रंथालय विस्तारीत इमारत आणि महाविद्यालय कँटिन आदी इमारतींचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.शरद पवार यांचे सकाळी ११.३० वाजता येथे आगमन झाले. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गव्हाणफाटा येथून बाइक रॅली काढून स्वागत केले. त्यानंतर जेएनपीटी टाउनशिप गेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि कार्यकर्त्यांनी त्यांना चांदीची ढाल देऊन त्यांचा सत्कार केला.शरद पवार यांनी सांगितले की, येथील लोकांनी जेएनपीटीसाठी आपल्या जमिनी कवडीमोल दराने देऊन देशाच्या विकासाला आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम केले आहे. त्यांच्या त्यागामुळेच या परिसरात आर्थिक सुबत्ता आणि विकास झालेला आहे. जेएनपीटीदेखील हजारो कोटी रुपये खर्च करून देशभरात विकास आणि नवे प्रकल्प राबवत आहे. येथील शेतकºयांनी केलेल्या त्यागामुळेच जेएनपीटीला हे करणे शक्य झाले आहे. मात्र, जेएनपीटी या लोकांच्या त्यागामुळे कमावलेला पैसा इतरत्र खर्च करत आहे. हजारो कोटी इतरत्र खर्च करणाºया जेएनपीटीने उरण परिसरातील प्रकल्पग्रस्तांसाठी मात्र छदामही खर्च केला नाही. हा कृतघ्नपणा असून, त्याग करायचा एकाने व त्याचा लाभ घ्यायचा दुसºयांंनी ही भूमिका कदापि चालू देणार नाही, असा कडक इशारा शरद पवार यांनी जेएनपीटीला भाषणातून दिला. जेएनपीटीच्या या भूमिकेविरोधात मी प्रकल्पग्रस्तांच्या सोबत असून, यासाठी दिल्लीपर्यंत लढण्यास तयार असल्याचे पवार यांनी सांगितले.या वेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांचेही भाषण झाले. त्यांनी चार महिन्यांत येथे नवीन इंजिनीअरिंग कॉलेज उभारण्यात येईल, असे सांगून या महाविद्यालयात चांगले शिक्षण मिळण्यासाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण केल्या जातील, असे सांगितले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, वीर वाजेकर महाविद्यालयाचे चेअरमन पी. जे. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, प्राचार्य गोरख सांगळे आणि मान्यवर उपस्थित होते.राष्ट्रवादीचे रायगडसह मावळवर लक्षराष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पनवेल व उरण दौºयामुळे राजकीय चर्चेलाही उधाण आले आहे. राष्ट्रवादीने मावळ व रायगड लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. मावळ मतदार संघामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक लढण्याची चर्चा आहे. पार्थ यांनी मध्यंतरी पनवेलला भेट दिली होती. अजित पवार हेही कार्यक्रमासाठी पनवेलमध्ये येऊन गेले आहेत. त्यांच्यानंतर शरद पवार यांनी पनवेल व उरणचा दौरा केला. कोपर येथील जे. एम. म्हात्रे यांच्या निवासस्थानी एक तास शेकाप व राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बंददार चर्चा झाली.राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते सुनील तटकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत उपस्थित होते. लोकसभेला शेकापने राष्ट्रवादीला मदत करावी व विधानसभेला राष्ट्रवादीने मदत करावी, अशी रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. शेकाप व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नक्की काय खलबते केली, या विषयी काहीही भाष्य केले नसले तरी त्याचे पडसाद लवकरच येथील राजकीय पटलावर दिसतील, असे बोलले जात आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJNPTजेएनपीटी