प्रशिक्षणात ग्रामीण महिलांचा सहभाग

By Admin | Updated: March 8, 2016 02:02 IST2016-03-08T02:02:16+5:302016-03-08T02:02:16+5:30

पोलादपूर तालुक्यातील कुडपण, परसुले, गोळेगणी, पैठण, कोतवाल, ओंबी उमरठ, बोरज, वाकण, देवळे ,कापडे , गोवेळे या अकरा गावांमध्ये सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग आणि वसुंधरा पाणलोट

Rural women participate in the training | प्रशिक्षणात ग्रामीण महिलांचा सहभाग

प्रशिक्षणात ग्रामीण महिलांचा सहभाग

अलिबाग : पोलादपूर तालुक्यातील कुडपण, परसुले, गोळेगणी, पैठण, कोतवाल, ओंबी उमरठ, बोरज, वाकण, देवळे ,कापडे , गोवेळे या अकरा गावांमध्ये सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग आणि वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत तीन महिन्यांचा उपजीविका कौशल्य विकास कार्यक्रम गावस्तरावर राबविण्यात आला. या अंतर्गत उपजीविका कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत तीन दिवसांचे प्रशिक्षण विविध गावातील स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी गट, वैयक्तिक लाभार्थी यांना त्यांनी निवडलेल्या कृषक व अकृषक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचे सकारात्मक परिणाम साध्य होत आहेत. यामध्ये ग्रामीण महिला मोठ्या उत्साहाने सहभागी होत असल्याची माहिती सुरभी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया जेधे यांनी दिली आहे.
ग्रामीण उपजीविका आधारित उद्योग निर्मिती, उद्योग उभारण्यासाठी संधी, शाश्वन उद्योग उभारणी, बचत गट आणि उपभोक्ता गट यांना उपजीविका संधीच्या नवीन वाटा, बाजारपेठ, पॅकिंग तसेच बचत गट, शेतकरी गट, वैयक्तिक लाभार्थी यांच्या सहलीमध्ये प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. विविध प्रकारची लोणची , दुग्ध व्यवसाय, जर्सीगाई व गिरजातीच्या गार्इंचे व्यवस्थापन,चारा व दूध डेअरी, स्ट्रॉबेरी लागवड, भाजीपाला लागवड, शेळीपालन, देशी कुक्कुटपालन, नर्सरीमध्ये फुलझाडे, मसाल्यांची झाडे,औषधी वनस्पती लागवड, अगरबत्ती निर्मिती, पॅकिंग व लेबलिंग आदिविषयक प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले.
जनकल्याण ट्रस्ट महाडमध्ये शेतीसंदर्भात वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग करुन महाड-पोलादपूर तालुक्यामध्ये आगळा आदर्श शेतकऱ्यांसमोर निर्माण केला आहे. या कार्यक्रमाकरिता तेजाली निकम, सुषमा गोलांबडे आदिंचे सहकार्य लाभले आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Rural women participate in the training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.