कुटुंबाचा वारसा पुढे चालवा

By Admin | Updated: March 26, 2017 04:50 IST2017-03-26T04:50:11+5:302017-03-26T04:50:11+5:30

नकल्याणाकरिता आजोबा आणि वडिलांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा असाच पुढे चालवा, असे आशीर्वाद

Run the family heritage forward | कुटुंबाचा वारसा पुढे चालवा

कुटुंबाचा वारसा पुढे चालवा

अलिबाग : जनकल्याणाकरिता आजोबा आणि वडिलांचा राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा असाच पुढे चालवा, असे आशीर्वाद ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नवनिवार्चित जि.प.अध्यक्षा अदिती तटकरे यांना दिले आहेत.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी, पदाचा पदभार स्वीकारल्यावर शुक्रवारी सकाळी रेवदंडा येथे ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली. त्या वेळी ज्येष्ठ निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी, रोहा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, पूजा पोटफोडे आदी उपस्थित होते.
अदिती तटकरे यांनी आपले आजोबा दत्तात्रेय तटकरे, वडील राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या पावलावर पाऊ ल ठेवीत राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला. नुकतीच जिल्हा परिषद गट वरसेमधून निवडणूक लढवून मोठा विजय संपादन केला. शेकापक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने त्यांना रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अदिती तटकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय युवती संघटकपदी क्रियाशील आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Run the family heritage forward