शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

रायगड जिल्ह्यात जीवघेण्या व्हायरसची अफवा, परप्रांतीयांमधून संक्रमण होत असल्याची चर्चा, नागरिक भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 20:22 IST

Raigad News: आक्षी-साखर गावामध्ये माणस मरत आहेत, अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे.

रायगड - अलिबाग तालुक्यात गॅस्ट्राेने दाेघांचा बळी घेतला तर अन्य १८ जण सरकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये परप्रांतीयांचा समावेश असल्याने यांनीच काेणता तरी वेगळा राेग आणल्याने आक्षी-साखर गावामध्ये माणस मरत आहेत, अशी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भातीचे वातावरण आहे. (Rumors of deadly virus in Akshi Village Raigad district, talk of infection from foreigners, citizens scared)

आक्षी-साखर परिसरामध्ये मासेमारी व्यवसाय जाेरात चालताे. या ठिकाणी परप्रांतीय नागरिक माेठ्या संख्येने स्थानिकांच्या बाेटीवर कामाला आहेत. काेराेनाचे सावट, विविध नैसर्गिक वादळांचा फटका बसल्याने मासेमारी व्यवसाय डबघाईला आला आहे. पावसाळ्यात मासेमारी व्यवसाय बंद असताे. आता ताे बऱ्यापैकी सुरू झाला आहे. त्यामुळे परप्रांतात गेलेले मजूर पुन्हा परतले आहेत. १९ ते २१ सप्टेंबर या कालावधीत तब्बल २० रुग्ण गॅस्ट्राेच्या आजाराने त्रस्त झाले. त्यांच्यावर अलिबागच्या सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात येत असताना दाेघांचा मृत्यू झाला हाेता. या प्रकारानंतर २३ सप्टेंबर राेजी सकाळपासूनच आक्षी-साखरमध्ये काेणता तरी राेग आला असून त्यामुळे माणसे मरत आहेत, असल्याची अफवा पसरल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तसेच परप्रांतातील मजुरांमध्ये या रोगाचे संक्रमण झाल्याच्या चर्चांना उधाण आले.

बाेटीवर काम करण्यासाठी दरवर्षी नवीन माणसे येत असतात. कधी-कधी त्यांना हवामान आणि बाेटीवरील वास्तव्य रुचत नाही. काही आपल्या गावी परत जातात. गावात कसलाच व्हायरस आलेला नाही. नागरिकांनी अफवा पसरवू नका आणि अफवांवर विश्वासही ठेवू नका.-कैलास चाैलकर, काेळी समाज, माजी अध्यक्ष

गावात कसलाही व्हायरस आलेला नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. गावात काहींना त्रास झाला. तशी घटना मुंबई येथील मडमध्येही घडली आहे.-आनंद बुरांडे, उपसरपंच, आक्षीगावात काेणताही नवीन रुग्ण सापडला नाही अथवा काेणाचा मृत्यूही झालेला नाही. व्हायरस पसरल्याची अफवा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या तब्येतीची काळजी घ्या.- डाॅ. अभिजित घासे, आराेग्य अधिकारी, अलिबाग 

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्य