पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान, १३२६ कर्मचाऱ्यांना लाभ
By वैभव गायकर | Updated: October 16, 2025 19:16 IST2025-10-16T19:15:54+5:302025-10-16T19:16:21+5:30
Diwali Bonus Panvel Municipal Employee : पनवेल महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षाकरिता सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे.

पनवेलमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांना ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान, १३२६ कर्मचाऱ्यांना लाभ
-वैभव गायकर
पनवेल - पनवेल महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्ताने आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ या वर्षाकरिता महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांना 32 हजार रूपये तसेच प्राथमिक शिक्षकांना ,एनयुएलएम व पीएमएवाय अधिकारी यांना रूपये 10 हजार, परिश्रमिक अधिकारी, एनयुएचएम यांना 7 हजार व आशा वर्कर व गट प्रर्वतक यांना 7 हजार सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.
या सानुग्रह अनुदानांतर्गत महानगरपालिकेतील प्रतिनियुक्तीवरील 5 अधिकारी, आस्थापनेवरील अधिकारी व कमर्चारी 825 , प्राथमिक शिक्षक 68, एनयुएलएम अधिकारी 2, एनयुएचएम अधिकारी 2, परिश्रमिक अधिकारी 17 , एनयुएचएम अधिकारी 24 , कर्मचारी आणि आशा वर्कर , गटप्रवर्तक अशा मिळून 204 एकूण 1 हजार 326 अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयामुळे पनवेल महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांच्या कार्यक्षमता व सेवाभावना अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.