रायगडमध्ये 24 तासात रोहा येथे सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद

By Admin | Updated: June 20, 2016 10:30 IST2016-06-20T10:29:52+5:302016-06-20T10:30:35+5:30

जिल्ह्यात 24 तासात (सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत) सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. याच 24 तासात जिल्ह्यात एकुण 762.20 मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पजर्न्यमान 47.64 मिमी होते

Roha received the highest 177 mm rainfall in 24 hours in Roha | रायगडमध्ये 24 तासात रोहा येथे सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद

रायगडमध्ये 24 तासात रोहा येथे सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद

ऑनलाइन लोकमत - 
जिल्ह्यात सरासरी 47.64 मिमी पाऊस, गतवर्षीच्या तूलनेत 914 मिमीची घट
 
रायगड, दि. 20 -   जिल्ह्यात 24 तासात (सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत) सर्वाधिक 177 मिमी पावसाची नोंद रोहा येथे झाली आहे. याच 24 तासात जिल्ह्यात एकुण 762.20 मिमी पाऊस झाला असून हे सरासरी पजर्न्यमान 47.64 मिमी होते.
 
गिरिस्थान माथेरान येथे शुन्य पावसाची नोंद
दरम्यान याच चोवीस तासात जिल्ह्यातील उवर्रित ठिकाणचे पजर्न्यमान (मिमी मध्ये)पूढील प्रमाणो असून, कंसातील आकडा गतवर्षीचे याच चोवीस तासाच्या काळातील पजर्न्यमान दर्शविणारा आहे- रोहा-177(148),तळा-109(199), मुरुड-105(174), सुधागड-63(101), श्रीवर्धन-42(104), म्हसळा-41(111),  उरण-30(127), पनवेल-23(61), अलिबाग-21(81), कजर्त-13.2(61.3),महाड-20(63), पोलादपूर-19(87),पेण-13(113.3), खालापूर-6(51)आणि गिरिस्थान माथेरान-0(103).
 
गतवर्षीच्या तुलनेत एकुण पजर्न्यमानात 914.40 मिमी घट 
गतवर्षीच्या पावसाळ्यात 20 जून 2015 सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकुण पावसाची नोंद 6 हजार 873 मिमी होऊन हे सरासरी पजर्न्यमान 429.56 मिमी होते, तर यंदा 20 जून 2015 सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकुण पावसाची नोंद केवळ 762.20 मिमी होवून हे सरासरी पजर्न्यमान केवळ 47.64 मिमी झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत एकुण पजर्न्यमानात 914.40 मिमी घट असल्याचे सोमवारी सकाळी आठ वाजता स्पष्ट झाले आहे.
 

 

Web Title: Roha received the highest 177 mm rainfall in 24 hours in Roha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.