शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

रोहा तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:02 AM

नागरिक संतप्त; सिटीझन्स फोरमने घेतली उपविभागीय अभियंता यांची भेट

रोहा : तालुक्याला जोडणाºया सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. कोलाड, मुरुड आणि अलिबाग हे मार्ग उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांत दुचाकी वाहनांचे चाक अडकून प्रवासी जखमी होत आहेत. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनांना अपघात होत आहेत. रोहा तालुक्यातील खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवाशांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन रोहा तालुका सिटीझन्स फोरमच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अभियंता यांची भेट घेऊन ररस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने भरण्याची सूचना केली आहे.तालुक्यातील कोलाड राज्यमार्गावरील एच पी पेट्रोल पंप ते एक्सेल स्टॉप दरम्यान भयानक मोठमोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यात वाहनांची चाके अडकून पडत आहेत. मागील आठवडाभरात एकही दिवस असा गेला नाही की या मार्गावरील खड्ड्यात वाहनांचे चाक अडकून अपघात घडला नाही. कोलाड आणि मुरुड मार्गावर सातत्याने वर्दळ सुरू असून धाटाव येथील औद्योगिक क्षेत्र, शाळा, महाविद्यालय आदींसह रोहा शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी असते. या मार्गावर लहान मोठ्या वाहनांसह जड -अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. धाटाव एमआयडीसीत येणारा कामगार वर्ग तसेच शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी वेळेवर पोहचण्याच्या नादात घाईघाईत ये-जा करीत असतात, अशा वेळी हे भले मोठे खड्डे अपघाताला कारण ठरत आहेत. यंदा झालेल्या मुसळधार पावसाने कोलाड, मुरुड आणि अलिबाग राज्यमार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडलेले असून ते चुकविण्याच्या नादात दुचाकी गाड्यांची चाके खड्ड्यात अडकली जाऊन अपघात होत आहेत. या अपघातांचे पर्यवसान विवादात होत असून चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांचे स्वरूप मोठे असल्याने चारचाकी छोटी वाहनेही अडकून राहत आहेत. दुसरीकडे या खड्ड्यांमधून पादचाºयांवर उडणारे चिखलही वादाचे विषय ठरत असल्याचे प्रवासी आणि नागरिक संतप्त आहेत. प्रवाशांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन रोहा तालुका सिटीझन्स फोरमच्या शिष्टमंडळाने निमंत्रक आप्पा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता ए. डी. देवकाते यांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली व रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने भरण्याची सूचना केली आहे. यावेळी राजेंद्र जाधव, नीलेश शिर्के , महेंद्र मोरे आदी उपस्थित होते.जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवासकोलाड मार्गावर रोहा स्वागत कमानी, वरसे राठी स्कूल, एच पी पेट्रोल पंप, पालदाड पूल, एक्सलस्टॉप, एम. बी. मोरे शाळा, जैनवाडी धाटाव, बरसोली, किल्ला कृषी विद्यापीठ, संभे, आंबेवाडी, कोलाड नाक्यापर्यंत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते याचा अंदाज करता येत नाही, तर मुरुड मार्गावर जिथे तिथे खड्ड्यांचे साम्राज्य आहे. रोहा नगरपालिकेकडे असलेल्या रोहा तहसील कार्यालय ते म्हाडा वसाहत हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पुढे खारी, कुंभोशी, चणेरा, पारंगखार रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रोहा पोलीस स्टेशनपासून सर्व रस्ता उखडलेला आहे. मुरुडप्रमाणेच अलिबाग रस्त्याचीही अवस्था भयंकर झाली असल्याने कोणत्या रस्त्याने अलिबागला जावे असा प्रश्न रोहेकरांना भेडसावत आहे. तर या सर्वच मार्गांवरून प्रवास करताना प्रवाशांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.कोलाड, मुरुड आणि अलिबाग या सर्व मार्गांवरील खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेच अंत न पाहता तातडीने रस्त्यांवरील खड्डे भरावेत.- आप्पा देशमुख, निमंत्रक -रोहा तालुका सिटीझन्स फोरम.खड्डे भरण्याचे काम सुरू केलेले असून खड्डे तातडीने भरण्याच्या सूचना ठेकेदारांना दिलेल्या आहेत. कोलाड ते चणेरा पारंगखार हा रस्ता पावसाळ्यानंतर नव्याने बांधण्याचे प्रस्तावित आहे. रोहा शहरातून जाणारा दमखाडी ते म्हाडा वसाहत दरम्यान असलेला रस्ता हा रोहा नगरपालिकेच्या ताब्यात असून तेथील खड्डे पालिका प्रशासनाने भरावयाचे आहेत.- ए. डी. देवकाते, उपविभागीय अभियंता,बांधकाम विभाग

टॅग्स :Potholeखड्डे