नेरळमधील रस्ताच गेला चोरीला, ग्रामस्थाची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 12:24 AM2020-06-26T00:24:00+5:302020-06-26T00:24:16+5:30

रस्ता न करताच बिले काढल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असल्याने तत्कालीन सरपंच व सदस्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.

The road in Neral was stolen, villagers complained | नेरळमधील रस्ताच गेला चोरीला, ग्रामस्थाची तक्रार

नेरळमधील रस्ताच गेला चोरीला, ग्रामस्थाची तक्रार

Next

विजय मांडे
कर्जत : तालुक्यातील सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये चक्रावून सोडणारे एक प्रकरण समोर आले आहे. या ग्रामपंचायत हद्दीत ग्राम निधीमधून तयार केलेला एक रस्ताच चोरीला गेला आहे. एप्रिल २०१९ मध्ये नेरळ हेटकर आळी भागात एका काँक्रीट रस्त्याचे काम करून बिल काढण्यात आले होते. मात्र, आता तो रस्ताच त्या ठिकाणी नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. तसेच संबंधित रस्त्याचा शोध घेण्याची विनंतीही केली आहे. दरम्यान, रस्ता न करताच बिले काढल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असल्याने तत्कालीन सरपंच व सदस्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नदेखील उपस्थित झाला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या हेटकर आळी भागात अजित सावंत यांचे घर ते सुगवेकर वाड्यापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता व गटाराचे काम नव्याने होणार होते. यासाठी ग्राम निधीमधून दोन लाख ९० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा रस्ता झाला, पण तो केवळ कागदावरच. कारण प्रत्यक्षात हा रस्ता झालाच नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. तर नेरळ ग्रामपंचायतीमधून या रस्त्यासाठी १४ मे २०१९ रोजी दोन लाख ७५ हजार एवढे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. पण या रस्त्याच्या कामासाठी शासकीय नियम-अटींना तिलांजली देत काम करण्यात आल्याचे समोर आले आहे. या कामाचे मूल्यांकन करणाऱ्या पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता असलेल्या मनीषा शीड यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर ज्यांचे या प्रकरणातील माजी उपसरपंच केतन पोतदार यांचा संपर्क झाला नाही.
।ठेके दाराची नियुक्ती न करताच काम?
नेरळ ग्रामपंचायतीमधून या रस्त्यासाठी १४ मे २०१९ रोजी दोन लाख ७५ हजार एवढे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. कोणतेही कार्यारंभ आदेश व ठेकेदाराची नियुक्ती न करताच कामाची घाई करण्यात आली, त्यामुळे रस्ता न करताच बिल काढल्याचे समोर आले. हा रस्ता तयार झाला, मग तो गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत
स्थानिक ग्रामस्थ देवा गवळी
यांनी रस्ता चोरीला गेल्याची
तक्रार नेरळ ग्रामपंचायतीकडे
केली आहे.
>या रस्त्याचे प्रकरण तत्कालीन सरपंच व सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या कार्यकाळातील आहे. या प्रकरणाची माहिती माझ्याकडे नाही. तेव्हा याबाबत चौकशी करून योग्य ती माहिती वरिष्ठ कार्यालयास दिली जाईल.
- एम.डी. गोसावी,
ग्रामविकास अधिकारी, नेरळ

Web Title: The road in Neral was stolen, villagers complained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.