शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रेवस-करंजा बोटसेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:45 IST

जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा : समुद्रात सहा मीटर उंचीच्या लाटांची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

अलिबाग : अरबी समुद्रात चक्रिवादळाची निर्मिती झाल्याने बुधवार व गुरुवारी सहा मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली असून कोकण किनारपट्टीतील पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे व रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील मच्छीमारांना समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर किनारी भागातील सर्व गावांत सतर्कतेचा इशारा देऊन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती निवारण कक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.

वादळाच्या इशाºयाच्या पार्श्वभूमीवर, रेवस बंदरावर धोका दर्शविणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. रेवस येथे मोठ्या लाटादेखील अनुभवास आल्या. परिणामी, अलिबाग तालुक्यातील रेवस आणि उरण तालुक्यातील करंजा या दरम्यान पावसाळ््यातही चालू असणारी प्रवासी बोट सेवा बुधवारी सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली होती. परिणामी, या प्रवासी सागरी मार्गाने उरण, पनवेल येथे दररोज नोकरीकरिता ये-जा करणारे व अन्य प्रवासी यांची मोठी गैरसोय झाली. या सर्व प्रवाशांना अलिबाग-पेण-पनवेल असा प्रवास करून उरण व मुंबईत पोहोचावे लागले.२४ तासांत मोठ्या पावसाची शक्यताच्रायगड जिल्ह्यात येत्या २४ तासांत मोठ्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाजहवामान खात्याने वर्तविला असून त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील संबंधित सर्व यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडWaterपाणीRainपाऊस