कशेडी घाटात कंटेनर पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:03 IST2017-08-03T02:03:35+5:302017-08-03T02:03:35+5:30

मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारा कंटेनर पार्टेवाडी गावच्या हद्दीत एका अवघड वळणावर पलटी होवून चालक

Reversal Container in Cassidy Hoist | कशेडी घाटात कंटेनर पलटी

कशेडी घाटात कंटेनर पलटी

पोलादपूर : मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारा कंटेनर पार्टेवाडी गावच्या हद्दीत एका अवघड वळणावर पलटी होवून चालक किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी स. ८.३० वाजताच्या सुमारास धामणदेवी गावच्या हद्दीत घडली आहे. सुदैवाने जीवित हानी टळली.
कंटेनर चालक रवींद्रकुमार अझाद प्रसाद (२८, रा. मुंबई) हा कंटेनर घेवून मुंबईहून चिपळूण दिशेने जात असता धामणदेवी गावच्या हद्दीत एका अवघड वळणावर कंटेनरने झोला मारल्याने पलटी झाला. या अपघातात चालक रवींद्रकुमार प्रसाद हा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती समजताच कशेडी टॅपचे पीएसआय दीपक सावंत आदींनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Reversal Container in Cassidy Hoist