शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे ग्रहण, ‘कॉस्ट कटिंग’मुळे पदे भरता येणार नसल्याचे सरकारकडून जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 2:55 AM

रायगड जिल्हा महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. लिपीक, टंकलेखक, तलाठी, शिपाई, वाहन चालक यांच्यासह अन्य २१९ पदे रिक्त असल्याने महसुलाचा गाडा ओढताना प्रशासन चांगलेच मेटाकुटीला आले आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्हा महसूल प्रशासनाला रिक्त पदांचे लागलेले ग्रहण सुटता सुटत नाही. लिपीक, टंकलेखक, तलाठी, शिपाई, वाहन चालक यांच्यासह अन्य २१९ पदे रिक्त असल्याने महसुलाचा गाडा ओढताना प्रशासन चांगलेच मेटाकुटीला आले आहे. सातत्याने सरकारकडे याबाबतचा अहवाल देऊन सुध्दा ‘कॉस्ट कंटींगमुळे’ ही पदे भरता येणार नसल्याचे सरकारने आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे सरकारी नोकरीकडे डोळे लावून बसलेल्या सुशिक्षीत बेरोजगारांचा भ्रमनिरास झाल्याचे बोलले जाते.केंद्र सरकाने दोन दिवसांपूर्वी रिक्त पदांबाबत सर्व मंत्रालय आणि विविध कार्यालयांकडून अहवाल मागीतला आहे. रिक्त असणारी सर्व पदे रद्द करण्याबाबत केंद्र सरकार गांभिर्याने विचार करीत आहे. त्यामुळे तेच धोरण राज्य सरकाने स्विकारले, तर राज्यातील हजोरोंच्या संख्येने पदे रद्द होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.रायगड जिल्हा प्रशासनाला जिल्ह्यातील १५ तालुक्यातील कारभारावर लक्ष ठेवावे लागते. दैनंदिन कामांबरोबरच जिल्ह्यातील महसूल गोळा करण्याचे महत्वाचे कार्य या विभागाला करावे लागते. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन सरकराने ते जिल्हा प्रशासनाला देऊ केले होते. मात्र कालांतराने निवृत्त झालेले कर्मचारी आणि पदोन्नतीमुळे काही पदे रिक्त झाली आहेत. केंद्र सरकाने दोन दिवसांपूर्वी रिक्त पदांबाबत सर्व मंत्रालय आणि विविध कार्यालयांकडून अहवाल मागीतला आहे. रिक्त असणारी सर्व पदे रद्द करण्याबाबत केंद्र सरकार गांभिर्याने विचार करीत आहे. त्यामुळे तेच धोरण राज्य सरकाने स्विकारले, तर राज्यातील हजोरोंच्या संख्येने पदे रद्द होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.ग्रामिण भागातून महसूल गोळा करण्याची महत्वाची भूमिका बजावणारे तलाठी ३३१ आहेत, तर ३९ तलाठ्यांची अद्याप जिल्ह्याला गरज आहे. तलाठ्यांची ३७० पदे सरकारने मंजूर केलेली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची फारच तारांबळ उडते. कामे उरकण्यासाठी त्यांना एकाच पदावरील व्यक्तीकडे दोन-तीन कामांचा अधीक भार द्यावा लागत आहे. एकाच व्यक्तीवर कामाचा जादा ताण येत असल्याने कामामध्ये गुणवत्ता ठेवताना त्यालाही तारेवरची कसरतच करावी लागते. ज्यादा कामामुळे अतिरिक्त काम करावे लागत असल्याने कर्मचाºयांना आपल्या कुटुंबालाही वेळ देता येत नसल्याने त्यांच्या आरोग्यासह मानसिकतेवर परिणाम होत असल्याची खंत काही कर्मचाºयांनी बोलून दाखवली.सरकारने नव्याने नोकरभरती न करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच कॉस्ट कंटीगमुळे रिक्त पदांनाही ग्रहण लागले आहे. सरकारी नोकरी मिळावी यासाठी मोठ्या संख्येने तरुण सरकारी नोकरीच्या जाहीरातीकडे डोळे लावून बसलेले आहेत. परंतु सरकार रिक्त पदांबाबत उदासिन असल्याने ती भरत नसल्याची ओरड केली जात आहे. सरकारने किमान रिक्त पदे भरली, तरी काही अंशी बेरोजगारी संपण्यास मदत होणार आहे. सरकारने तातडीने या बाबींचा विचार करावा अशी मागणी होत आहे.जिल्ह्यातील रिक्त पदेजिल्ह्यासह तालुक्याच्या कानाकोपºयात तातडीने पोचण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही सरकराने केली आहे. मात्र वाहनचाकांची भरती न केल्याने ७७ पदे रिक्त आहेत.वाहन चालकांची ६३३ पदे मंजूर आहेत, तर ५५७ पदांवर वाहनचालक कार्यरत आहेत. टेंबलांवरुन फाईलींचा प्रवास ज्या व्यक्तीच्या माध्यमातून होतो. त्या शिपाई संर्वगाची १३८ पदे मंजूर आहेत, परंतु फक्त १२३ पदेच भरलेली आहेत, तर १५ वाहन चालाकांची अद्यापही प्रशासनाला गरज आहे.रखवालदार १९ पदे भरलेली आहेत, तर चार पदे रिक्त आहेत. स्वच्छकांच्या बाबतीमध्येही १६ पदे मंजूर असताना केवळ १२ स्वच्छकच कामावर आहेत. उर्वरीत चार पदे रिक्त आहेत.गोदाम पहारेकºयांच्या ३२ पैकी २९ पदे भरलेली आहेत, तर तीन पदे रिक्त आहेत. हमाल कम स्विपर यांची १६ पैकी १५ पद भरलेली आहेत, तर एकच पद रिक्त आहेत.