माणगावच्या समर्थ नगरचे रहिवासी सांडपाण्याने त्रस्त
By Admin | Updated: May 12, 2017 01:52 IST2017-05-12T01:52:41+5:302017-05-12T01:52:41+5:30
शहरात सध्या सांडपाण्याचा प्रश्न गाजतो आहे. काळ नदी ही तर दूषित झाली असून बिल्डर लॉबीने आपली पोळी भाजून घेण्यासाठी

माणगावच्या समर्थ नगरचे रहिवासी सांडपाण्याने त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
माणगाव : शहरात सध्या सांडपाण्याचा प्रश्न गाजतो आहे. काळ नदी ही तर दूषित झाली असून बिल्डर लॉबीने आपली पोळी भाजून घेण्यासाठी ग्रामस्थांना वेठीस धरल्याचे चित्र माणगावात पहाण्यास मिळत आहे. शहरातील समर्थनगर येथील एका बिल्डरने आपल्या गृहप्रकल्प इमारतीचे सांडपाणी अतिक्रमण करून जवळच्या ग्रामस्थांच्या मालकी जागेत सोडल्याने या नगरातील ग्रामस्थांनी नगरपंचायत माणगावकडे तक्रार केली असून नगरपंचायत प्रशासनाने अद्याप या बिल्डरवर कोणतीही कारवाई न केल्याने ग्रामस्थांनी नगरपंचायतीवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
माणगाव नगरपंचायत हद्दीतील तहसीलदार कार्यालयाजवळील समर्थनगर या ठिकाणी कदम नावाच्या बिल्डरने गृहप्रकल्प उभारले असून या गृहप्रकल्प इमारतीत ३० ते ३२
कु टुंबेरहात आहे. या सर्व कु टुंबांचे सांडपाणी गटाराद्वारे पाइप लावून शेतातील ग्रामस्थांच्या जागेत सोडण्यात आल्याने हे ग्रामस्थ या सांडपाण्याला दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत.
याबाबतीत समर्थनगरातील रहिवाशांनी नगरपंचायत माणगाव यांच्याकडे सुरु वातीस ७ एप्रिल २०१७ रोजी तक्र ार अर्ज केला होता. त्यानंतर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवक यांच्या समवेत समर्थ नगरातील रहिवाशांची चर्चा झाली. त्यावेळी माणगाव नगरपंचायतीने कारवाईचे संकेत दिले होते, परंतु याबाबतीत कोणतीच कारवाई न झाल्याने समर्थ नगरातील ग्रामस्थ, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश धर्मा तळकर, प्रफुल्ल कुलकर्णी, विजयमाला आचार्य, महेंद्र पवार, दत्ताराम चाळके यांनी लेखी पत्राद्वारे सांगितले आहे.
ही समस्या अधिक बिकट होऊ लागल्याने पुन्हा एकदा समर्थ नगरातील ग्रामस्थांनी माणगाव नगरपंचायतीकडे १७ एप्रिल २०१७ रोजी तक्र ार अर्ज दिला आहे. यावर कारवाई होणे अपेक्षीत आहे.