पोलादपूर तालुक्यातील चार गणांचे आरक्षण जाहीर

By Admin | Updated: October 25, 2016 03:49 IST2016-10-25T03:49:37+5:302016-10-25T03:49:37+5:30

तालुक्यातील चार गणांचे आरक्षण तहसील कार्यालय पोलादपूर येथे जाहीर करण्यात आले. जिल्हा सांख्यिकी अधिकारी दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार

Reservation of four Ganas in Polladpur taluka | पोलादपूर तालुक्यातील चार गणांचे आरक्षण जाहीर

पोलादपूर तालुक्यातील चार गणांचे आरक्षण जाहीर

पोलादपूर : तालुक्यातील चार गणांचे आरक्षण तहसील कार्यालय पोलादपूर येथे जाहीर करण्यात आले. जिल्हा सांख्यिकी अधिकारी दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार काशिनाथ नाडेकर यांच्या उपस्थितीत आरक्षण प्रक्रि या पार पाडण्यात आली.
देवळे पंचायत समिती गण सर्वसाधारण, कोंढवी पंचायत समिती गण सर्वसाधारण स्त्री, गोवेले गण सर्वसाधारण स्त्री, लोहारे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण जाहीर झाले आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नीलेश अहिरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पार्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाय. सी. जाधव, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनंत माने, शेकापचे तालुका चिटणीस वैभव चांदे, माजी सभापती दिलीप भागवत आदी उपस्थित होते.
पोलादपूर पंचायत समिती गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे महादेव निविलकर हे आरक्षणामुळे व काँग्रेसचे दिलीप भागवत हे चिठ्ठीद्वारे निवडून येवून सभपतीपदी अडीच वर्षांचा कालावधी वगळता या पंचायत समितीवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता राहिली आहे. देवळे व गोवेले पंचायत समिती गण हे गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहेत. तालुक्यातील देवळे पंचायत समिती गण हा एकमेव सर्वसाधारणसाठी आरक्षित असल्यामुळे या गणामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटापैकी देवळे गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, पूर्वीचा पोलादपूर व आताचा लोहारे गट सर्वसाधारण झाला आहे. देवळे जिल्हा परिषद गटातील माजी उपाध्यक्ष व विद्यमान जि.प. सदस्य चंद्रकांत कळंबे यांचा मतदार संघ बी सी महिला झाल्यामुळे त्यांना नवीन मतदार संघ शोधावा लागणार आहे.

Web Title: Reservation of four Ganas in Polladpur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.