शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा यशस्वी होणारच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2020 05:21 IST

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रायगडमधील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी खासदार सुनील तटकरे यांची रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली.

श्रीवर्धन : महाराष्ट्रातील विद्यमान सरकार पूर्ण क्षमतेने आरक्षणासंदर्भात ठोस पावले उचलत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार दिल्लीमध्ये मी स्वत: तसेच महाराष्ट्रात निवडून गेलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे व काँग्रेस आयचे खासदार पूर्ण शक्तिनिशी मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहेत. या आरक्षणाच्या लढ्याला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रायगडमधील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी खासदार सुनील तटकरे यांची रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मराठा समाजाच्या विविध समस्या व मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने तटकरे यांना दिले. तटकरे म्हणाले, यापूर्वी राज्यात असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने आरक्षण देताना, केंद्राच्या संमतीने दिले असते, तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती. मात्र, भाजप सरकारने राजकारण करण्याच्या दृष्टिकोनातून जाणीवपूर्वक ठोस भूमिका घेतली नाही. तामिळनाडू राज्यामध्ये देण्यात आलेले आरक्षण तेथील राज्य सरकारने वेळीच केंद्राकडून परवानगी घेऊन आरक्षणाचा टक्का वाढविण्यात त्यांचे राज्य सरकार यशस्वी झाले.सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती अन्यायकारक आहे. मी स्वत: मराठा समाजाच्या मागण्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदन सादर करून याविषयी त्यांच्याशी चर्चा करेन.राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावले उचलत आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.

टॅग्स :Raigadरायगडsunil tatkareसुनील तटकरेMaratha Reservationमराठा आरक्षण