शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना : योजनेचा लाभच मिळत नसल्याने संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:35 IST

शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे.

दासगाव - शासनाच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ न मिळाल्याने आडी गवळवाडीवरील शेतकऱ्यांनी महाड तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तलाठी आणि ग्रामसेवक हे एकमेकांकडे बोट दाखवत शेतकऱ्यांना उत्तरे देत नसल्याने अखेर शेतक-यांनी हे निवेदन दिले आहे. याबाबत तहसीलदारांनी गंभीर दखल घेत योग्य कार्यवाही करण्याचे गट विकास अधिकारी यांना सूचित केले आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबवण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार साधारण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये या योजनेतील लाभार्थी शेतक-यांनी आपले अर्ज संबंधित शासकीय कर्मचाºयांकडे सुपूर्द केले. त्यातील काहींना या योजनेचा लाभ देखील प्राप्त झाला. मात्र महाड तालुक्यातील आडी गवळवाडी येथील शेतक-यांना या योजनेचा लाभच मिळाला नाही. या ग्रामपंचायतीमधील जवळपास ३२ शेतक-यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले अर्ज दखल केले होते. मात्र यातील केवळ दोनच शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. ज्या शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या शेतकºयांनी पुन्हा अर्ज करण्यासाठी प्रयत्न केले. अर्ज दाखल करण्याची तारीख २५ जून असून अर्ज आपल्याकडे नाहीत अशी उत्तरे तलाठी आणि ग्रामसेवकांकडून मिळत आहे. अर्ज या विहित वेळेत न मिळाल्यास अन्याय होण्याची भीती या शेतक-यांना आहे.याबाबत उर्वरित शेतक-यांनी ग्रामसेवक तायडे यांना विचारले असता त्यांनी तलाठ्यांकडे बोट दाखवले. मात्र हे काम ग्रामसेवकाकडे असल्याने आपला यात संबंध नाही असे उत्तर तलाठी पानसरे यांनी शेतकºयांना दिले. यामुळे या शेतकºयांनी थेट महाड सभापती दत्ताराम फळसकर यांची भेट घेतली. मात्र ग्रामसेवक तायडे याठिकाणी उपस्थित राहिले नाहीत.अखेर या ३२ शेतकºयांनी आपले निवेदन महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना दिले.आडी गवळवाडी येथील शेतकºयांनी महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना यामध्ये लक्ष घालावे अशी विनंती केली. तहसीलदार पवार यांनी तत्काळ महाड गट विकास अधिकारी प्रमोद गोडांबे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला आणि संबंधित ग्रामसेवकावर योग्य ती कार्यवाही व्हावी असे सूचित केले. पवार यांच्या या भूमिकेनंतर आडी गवळवाडी शेतकºयांनी गट विकास अधिकारी गोडांबे यांना देखील निवेदन दिले. यावेळी सरपंच विशाल चव्हाण, नथुराम कदम उपसरपंच, संतोष कांबळे, पांडुरंग कांबळे, सुनंदा खेडेकर, संतोष नटे, अंकिता महाडिक, सुषमा काते, ज्योती काते, आशा कांबळे, पार्वती मुरुडकर यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.आमच्या गावातील जवळपास ३२ शेतक-यांपैकी केवळ दोनच शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. याबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक उत्तर देत नाही. शिवाय तलाठी देखील हे काम आपले नसल्याचे ग्रामस्थ विजय खेडेकर यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड