शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

‘त्या’ उमेदवारांचे प्रतिनिधी १२ तासांच्या आत हजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:36 IST

अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोघे उमेदवार १२ तासांच्या आत रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात हजर झाले.

- जयंत धुळप अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोघे उमेदवार १२ तासांच्या आत रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात हजर झाले. हे दोघे ११ एप्रिल २०१९ पासून बेपत्ता असल्याची बातमी ‘लोकमत’ने शुक्रवारी उघड केली होती.दोन्ही अपक्ष उमेदवार तटकरे यांच्या निवडणूक प्रतिनिधींनी, शनिवारी होणाऱ्या बैठकीत हजर राहून हिशेब दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहिती उमेदवार निवडणूक खर्च ताळमेळ समितीच्या प्रमुख डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. या दोघांना ११ एप्रिलपासून बेपत्ता असल्यामुळे रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कडक कारवाई करण्याची नोटीस गुरुवारी बजावली. या पार्श्वभूमीवर दोन्ही अपक्ष उमेदवार तटकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सुनील पांडुरंग तटकरे (मु. पोयनार, अलाटीवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्याशी संपर्क झाला, ते म्हणाले, रायगड लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची एक नोटीस मिळाली आहे.ती कधीची आहे हे पाहवे लागेल. आपला खर्च सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी निवडणूक प्रतिनिधी कार्यालयात गेलो होते, अशी माहिती अपक्ष उमेदवार सुनील पांडुरंग तटकरे यांनी दिली. मात्र, ११ एप्रिलपासून कुठे होतो, यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. दरम्यान, दुसरे अपक्ष उमेदवार सुनील सखाराम तटकरे (रा. सावर, गौळआळी, ता. म्हसळा, जि. रायगड) यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019