पेण अर्बनच्या छोट्या खातेदारांना दिलासा

By Admin | Updated: August 27, 2015 00:51 IST2015-08-27T00:51:45+5:302015-08-27T00:51:45+5:30

बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना गणेशोत्सवापूर्वी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे १ ते १० हजार रुपये अशी रक्कम असलेल्या तब्बल १ लाख ३४ हजार ६५७

Remedies to small account holders of PEN Urban | पेण अर्बनच्या छोट्या खातेदारांना दिलासा

पेण अर्बनच्या छोट्या खातेदारांना दिलासा

अलिबाग : बुडीत निघालेल्या पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना गणेशोत्सवापूर्वी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यामुळे १ ते १० हजार रुपये अशी रक्कम असलेल्या तब्बल १ लाख ३४ हजार ६५७ छोट्या खातेदारांना त्यांची रक्कम परत मिळणार आहे.
उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर चार आठवड्यांच्या आत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती दि पेण को-आॅपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड प्रशासक मंडळ अध्यक्ष शरद जरे यांनी दिली आहे.
रक्कम खातेदारांना बँकेच्या ठिकठिकाणच्या संबंधित शाखेमध्येच स्टेट बँक आॅफ इंडियाच्या चेकद्वारे मिळणार असल्याची माहिती पेण अर्बन बँक प्रशासक मंडळातील ठेवीदार प्रतिनिधी तसेच ठेवीदार-खातेदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. ठेवीदारांचे हित विचारात घेवून,बँकेचे बँकिंग लायसन्स रिझर्व्ह बँकेने रद्द केले असतानाही दहा हजार रुपयांपर्यंतच्या ठेवीदार व खातेदारांना त्यांची १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम परत देण्याचा हा देशातील पहिलाच निकाल असल्याचे जाधव यांनी सांगितले.
१ लाख ३४ हजार ६५७ खातेदारांचे पैसे चालू खाते, बचतखाते, मुदत ठेवी, दैनिक खाते, आवर्ती खाते यामध्ये आहेत. एकाच खातेदाराची या सर्व खात्यांमध्ये असणारी रक्कम १० हजार रुपयांपेक्षा अधिक होत असल्यास, त्या खातेदारास मात्र या निर्णयाचा लाभ मिळू शकणार नाही. एक वा एकापेक्षा अधिक खात्यांतील एकूण रक्कम ही दहा हजार रुपयांच्या आत असणाऱ्या खातेदारांनाच याचा लाभ मिळणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)

विशेष व्यवस्था : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशापासून चार आठवड्यांत पैसे परत करण्याची कार्यवाही पूर्ण करावयाची असल्याने सर्व ठेवीदार व खातेदार यांच्या शंका व समस्या यांचे निरसन करण्याकरिता बँकेने संपर्कअधिकारी यांची मुख्य कार्यालय व शाखा स्तरावर नेमणूक केली आहे. यामध्ये अनिता मेश्राम, आरती सत्वे (मुख्य कार्यालय-पेण, शाखा कार्यक्षेत्र-पेण, रामवाडी, चिंचपाडा, वडखळ, पोयनाड ,संपर्क क्र मांक ०२१४३-२५३३१५), श्रेया साटम (शाखा कार्यक्षेत्र-गिरगांव, दादर, विलेपार्ले, उरण. संपर्क क्र मांक-०२२-२४३६२५०७), स्नेहा साळुंखे व भाग्यश्री नाईक (शाखा कार्यक्षेत्र- कर्जत, नेरळ, माथेरान, संपर्क क्र मांक-०२१४८-२२२२०३,२३८९१८),पूजा जोगळेकर व अक्षया लाड(शाखा कार्यक्षेत्र-खोपोली, शिळफाटा, वावोशी, मोहोपाडा. संपर्क क्र मांक ०२१९२-२६६२९४,२६३४४४), सोमनाथ अहिरे (शाखा कार्यक्षेत्र- रोहा, पाली, कोलाड. संपर्क क्र मांक ०२१९४-२३३९९१)यांचा समावेश आहे.

Web Title: Remedies to small account holders of PEN Urban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.