शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
2
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
3
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
4
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
5
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
6
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
7
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
8
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
9
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
10
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
11
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
12
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
13
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
14
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
15
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
16
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
17
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
18
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
19
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
20
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तेल कंपनीचे जहाज फुटल्याने मासे किना-यावर, सोशल मीडियावर अफवांना पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:18 IST

तालुक्यातील समुद्रकिना-यावर चार दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने मासे आले होते. त्यामुळे मच्छीमारांची चांगलीच चंगळ झाली होती; परंतु समुद्रामध्ये तेल कंपनीचे मोठे जहाज फुटल्याने मासे किनारी आले आहेत

अलिबाग : तालुक्यातील समुद्रकिना-यावर चार दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने मासे आले होते. त्यामुळे मच्छीमारांची चांगलीच चंगळ झाली होती; परंतु समुद्रामध्ये तेल कंपनीचे मोठे जहाज फुटल्याने मासे किनारी आले आहेत, तसेच ते मासे आरोग्यास घातक असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्याने मासळी उद्योगावर परिणाम झाला आहे. सोशल मीडियावर अशा अफवा पसरवणाºयांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी रायगड जिल्हा कोळी समाजाने केली. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना बुधवारी दिले.समुद्रातील अंतर्गत हालचालींमुळे चार दिवसांपूर्वी पाकट जातीचे मोठे मासे नवगाव, सासवणे, मांडवा किना-यावर आले होते. विशेषत: नवगावच्या समुद्रकिनारी ते मोठ्या संख्येने आले होते. सुमारे ४० वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती. अशा घटना घडणे म्हणजे त्सुनामी, अथवा भूकंप होण्याचे संकेत असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे.मोठ्या प्रामाणात मासे मिळत असल्याने अर्थकारण चांगलेच वधारले होते. त्यातच हे मासे आरोग्यास अपायकारक असल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने मासे खाण्यावर बंधन आली. त्यामुळे व्यवसाय संकटात सापडून मच्छीमारांवार उपासमारीची वेळ आली आहे. दिवसाला कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाल्याचे संघटनेचे सहचिटणीस प्रवीण तांडेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावर घाला घालणाºयांना शासन झालेच पाहिजे. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी अध्यक्ष धर्मा घारबट, मदन कोळी, मिलिंद कोळी यांच्यासह अन्य पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.पर्यावरण आणि मत्स्य विभागाचे शिक्कामोर्तब ‘मासे खा’किनाºयावर मोठ्या प्रमाणात आलेल्या माशांमुळे उलटसुलट चर्चा असताना, मात्र हे मासे खाण्यासाठी आरोग्याला हानिकारक नसल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिला आहे, तसेच हवामानातील नैसर्गिक बदलामुळे मासे किनाºयावर आले आहेत. ते मासे आरोग्यास अपायकारक नाहीत. कोणतेही जहाज बुडून केमिकल गळती झालेली नाही, असे मत अलिबाग येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी जिल्ह्यातील विविध मच्छीमार संस्थांना पत्र पाठवून कळवले आहे.

टॅग्स :RaigadरायगडSocial Mediaसोशल मीडिया