गोळीबार करणाऱ्यांची रेखाचित्रे जारी
By Admin | Updated: February 21, 2016 02:47 IST2016-02-21T02:47:11+5:302016-02-21T02:47:11+5:30
कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणी गुन्ह्याचा तपास लागावा म्हणून रायगड पोलीस आणि ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. दरोडेखोरांना पाहणाऱ्या जखमी आकाश धुळे यांच्या पत्नी

गोळीबार करणाऱ्यांची रेखाचित्रे जारी
नेरळ : कर्जत तालुक्यातील गोळीबार प्रकरणी गुन्ह्याचा तपास लागावा म्हणून रायगड पोलीस आणि ठाणे पोलिसांनी कंबर कसली आहे. दरोडेखोरांना पाहणाऱ्या जखमी आकाश धुळे यांच्या पत्नी स्वाती यांनी वर्णन केल्याप्रमाणे त्या दोन्ही दरोडेखोरांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. मात्र या गोळीबार प्रकरणाचा तपास रायगड पोलीस प्रमुख सुवेज हक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला आहे.
श्वानपथकाच्या माध्यमातून काही सुगावा लागतो काय, यासाठी श्वान नेरळ येथे आणण्यात आला आहे. गोळीबार प्रकरणाचा लवकर छडा लावला जावा यासाठी अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालय येथून श्वान आणण्यात आला होता. दुपारी घटनास्थळी कोदिवले येथे श्वानपथकाला फिरविण्यात आले. त्याने दरोडेखोरांनी प्रवेश केलेल्या घराची तसेच हाताचा स्पर्श केलेल्या वस्तू यांना हुंगून काही सुगावा लागतो का, याची माहिती करून घेतली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी दोन चित्रकारांच्या मदतीने स्वाती आकाश धुळे यांच्या खाणाखुणा आणि सांगण्यावरून त्या दोन्ही दरोडेखोर यांची रेखाचित्रे तयार केली आहेत. दोन्ही दरोडेखोर यांची रेखाचित्रे ठाणे आनिव रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणी यांच्याकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हा अधीक्षक शालिग्राम पाटील यांनी दिली.
सर्वांनी ग्रामीण भागात पाळत ठेवण्यास सुरु वात केली असून, संशयित दुचाकीस्वार यांची चौकशी सर्व ठिकाणी राज्य मार्ग तसेच महामार्ग या ठिकाणी सुरू आहे. मात्र तरीही कोणताही सुगावा लागत नसल्याने रायगड जिल्ह्याचे पोलीसप्रमुख सुवेज हक यांनी या गोळीबार प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे.