शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

अपंगांसाठी काम करण्यापूर्वी स्वयंसेवी संस्थांनी नोंदणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:24 AM

नोंदणी प्रमाणपत्र न घेतलेल्या व त्याचे नूतनीकरण न केलेल्या अनधिकृत अपंगांच्या विशेष शाळा /कार्यशाळांमध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये.

बोर्ली-मांडला : अपंग व्यक्ती (सामान संधी, हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५च्या कायद्याप्रमाणे, स्वयंसेवी संस्थांनी तथा व्यक्तींनी अपंग क्षेत्रात कार्य करण्याकरिता प्रथम सक्षम अधिकारी यांच्याकडून नोंदणी प्रमाणपत्र घेणे आणि त्याचे वेळेवर नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत असणाऱ्या अपंग विभागामार्फत आवाहन हे आवाहन करण्यात आले आहे.अपंग क्षेत्रात अशा प्रकारे नोंदणी प्रमाणपत्र न घेता व त्यांचे नूतनीकरण न करता, सुरू असलेल्या अपंगाच्या विशेष शाळा/कार्यशाळा या कायद्याप्रमाणे अनधिकृत असल्यामुळे कायदेशीर कारवाईस पात्र आहेत. अशा अपंगांच्या विशेष कार्यशाळा/ शाळाचालकाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. अशा अनधिकृत विशेष अपंगाच्या शाळा /कार्यशाळांवर नियंत्रण नसल्यामुळे त्या ठिकाणी अपंग मुलांच्या शिक्षण पुनर्वसन व निवासाच्या दृष्टीने योग्य सुविधा उपलब्ध आहेत, याची खात्री नसलेल्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना अशा विशेष अपंगाच्या विशेष कार्यशाळा /शाळांमध्ये प्रवेश घेणेदेखील व पुनर्वसनाच्या दृष्टीने हिताचे नाही. तसेच अशा अपंगाच्या विशेष शाळा/कार्यशाळांमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार संबंधित पालक आणि संस्था असतील.नोंदणी प्रमाणपत्र न घेतलेल्या व त्याचे नूतनीकरण न केलेल्या अनधिकृत अपंगांच्या विशेष शाळा /कार्यशाळांमध्ये आपल्या पाल्यास प्रवेश घेऊ नये. नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त अधिकृत अपंगाच्या विशेष शाळा /कार्यशाळा मध्येच प्रवेश घ्यावेत.या शाळांना मिळाले प्रमाणपत्ररायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथील भारतीय मानव विकास ट्रस्ट संचालित मतिमंद मुलांची विशेष शाळा, नवीन पनवेल येथील रोटरी क्लब आॅफ पनवेल इंडस्ट्रीअल टाउन चॅरिटेबल ट्रस्ट कर्णबधीर मुलांसाठी विशेष शाळा (निवासी), पनवेल तालुक्यातील क्रोपोली येथील कै. रामचंद्र कुरुलकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित मतिमंद आदिवासी मुलांचे कर्णबधीर विद्यालय, पनवेल तालुक्यातील काळसखंड येथील दातार इन्स्टिट्यूट फॉर स्पेशल एज्युकेशन अ‍ॅण्ड ह्युमन आॅक्टिविटीज दिशा मतिमंद मुलांची शाळा, कर्जत तालुक्यातील विनोबा मिशन संचलित विनोबा निवासी कर्णबधीर विद्यालय, कर्जत तालुक्यातील भिसेगाव येथील सह्याद्री आदिवासी ग्रामीण विकास प्रतिष्ठान मतिमंद मुलांची शाळा, खालापूर तालुक्यातील खोपोली येथील शालोम एज्युकेशन ट्रस्ट सालोम मतिमंद मुलांची शाळा, पेण येथील सूचित जीवन ट्रस्ट सुमंगल मतिमंद मुलांची शाळा/कार्यशाळा, आई डे केअर सेंटर मतिमंद मुलांचे व्यसाय प्रशिक्षण केंद्र, अलिबाग तालुक्यातील पिंपळभाट येथील पाठबळ सामाजिक विकास संस्था राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांची शाळा, मंगळ येथील सुयोग्य मेंटर्ली हँडिकॅप चॅरिटेबल ट्रस्ट सुयोग मतिमंद मुलांची शाळा, उरण येथील स्वामी ब्रम्हानंद प्रतिष्ठान संचलित स्वीकार मतिमंद मुलांची शाळा, रोहा येथील ज्ञानगंगा बहुविकलांग संस्था संचलित प्रेरणा मतिमंद मुलांची शाळा, आड शाळा ह्या नोंदणी प्रमाणपत्र शाळा प्राप्त आहेत.

टॅग्स :social workerसमाजसेवक