शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

तोफांच्या संवर्धनाला लालफितीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 05:00 IST

पुरातत्त्व विभागाचा पुढाकार : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिरंगाई

मुंबई : मरिन लाइन्स येथील महात्मा गांधी मार्गावर असलेल्या क्रॉस मैदानातील दोन तोफा संवर्धनाअभावी गंज खात पडून आहेत. या तोफांच्या संवर्धनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाने घेतल्यानंतरही केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगी अभावी त्या धूळखात पडून आहेत. चोरट्यांकडून तोफांची विल्हेवाट लावण्याआधी तरी जिल्हाधिकारी कार्यालय तोफा हलविण्यास परवानगी देणार का? असा सवाल दुर्गप्रेमींनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणात क्रॉस मैदानात दोन तोफा गंजत पडल्याची बाब सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेने पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या निदर्शनास आणून देत संवर्धनाची मागणी केली होती. त्याची दखल घेत संबंधित तोफा संचालनालयाच्या आवारात हलविण्याचा निर्णय पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाने संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनीघेतला.नियमानुसार मैदानातून संचालनालयाच्या आवारात तोफा हलविण्यासाठी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला गर्गे यांनी पत्र पाठविले. मात्र, त्यास २० दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने, तोफा चोरीला जाण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले की, क्रॉस मैदानात दोन तोफा दुरवस्थेत असल्याची माहिती प्रतिष्ठानने संचालनालयास १३ डिसेंबरला दिली होती, तसेच सुट्ट्या स्वरूपात पडलेल्या या दोन्ही तोफा उघड्यावर असल्याने, धातू वितळविण्याच्या एखाद्या चोरांच्या टोळीद्वारे घेऊन जाण्याची शक्यता प्रतिष्ठानने व्यक्त केली होती. त्याची दखल घेत संचालनालयाद्वारे दुसºयाच दिवशी, अर्थात १४ डिसेंबरला या तोफांची पाहणी केली होती.तोफांची सद्यस्थिती पाहता, त्यांची पुरातत्त्वीयदृष्ट्या नोंद घेणे आवश्यक असल्याची बाब संचालकांनी नोंदविली. या कामात संचालनालयाच्या मुख्यालय आवारात तोफा हलविण्याची संपूर्ण जबाबदारी सह्याद्री प्रतिष्ठानने घेतली. मात्र, नेमक्या तोफा कधी हलवायच्या, याबाबत संचालनालयाने कोणतीही माहिती दिली नसल्याचेही रघुवीर यांनी सांगितले.पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालकांनी संबंधित तोफा चोरीला जाण्याची भीती जिल्हाधिकारी यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान, समाजकंटकांनी तोफांचा काही भाग चोरी केल्याचे धक्कादायक वास्तव तोफांची पाहणी केल्यास लक्षात येते. त्यामुळे संपूर्ण तोफा चोरीला गेल्यानंतर प्रशासन संवर्धनास परवानगी देणार का, असा संतप्त सवाल दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे.तोफांचा इतिहास काय सांगतो?काही दिवसांपूर्वी राजभवनात सापडलेल्या दोन २२ टन वजनी तोफांच्याच प्रकारातील एक तोफ क्रॉस मैदानात आहे. वजनाने हलकी असलेली ही तोफ सीकॉस्ट कॅनोन प्रकारातील आहे. तर या ठिकाणी सापडलेली दुसरी तोफ पोर्तुगीज बनावटीची आहे. या तोफेवर १८५६ सालचा उल्लेखही आहे.

टॅग्स :Puneपुणे