रोह्यातील वकिलांनी ठेवले कामकाज बंद
By Admin | Updated: May 13, 2017 01:04 IST2017-05-13T01:04:31+5:302017-05-13T01:04:31+5:30
रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांचे पती अशोक केरू धोत्रे यांनी आपल्या विरुद्ध केस घेतल्याचा राग मनात

रोह्यातील वकिलांनी ठेवले कामकाज बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहा : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे यांचे पती अशोक केरू धोत्रे यांनी आपल्या विरुद्ध केस घेतल्याचा राग मनात धरून रोह्यातील वकील महेश कुशवाह यांना भर रस्त्यात अडवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याने रोह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अशोक धोत्रे व महेश रावकर यांच्याविरोधात फिर्यादीच्या
तक्र ारीवरून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेची गंभीर दखल रोहा बार असोसिएशनच्या वकिलांच्या संघटनेने घेतली. तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत शुक्रवारी दिवसभर रोह्यातील वकिलांनी आपले कामकाज बंद ठेवले होते.
अशोक धोत्रे यांनी एका वकिलाला भर दिवसा धमकाविण्याचा प्रयत्न केला, यामुळे रोह्यातील सुज्ञ नागरिकांकडून या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचा रोह्यातील वकील संघटनेने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून शुक्रवारी दिवसभर रोह्यातील वकिलांनी कामकाज बंद ठेवले, तसेच न्यायालयासह, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देत, रोह्यात गुंडाराज सहन केले जाणार नाही.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी सक्त कारवाई करावी अशी मागणी बार आसोसिएशनने के ली.