शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
3
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
4
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
5
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
6
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
7
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
8
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
9
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
10
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
11
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
12
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
13
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
14
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
15
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
16
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
17
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
18
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
19
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
20
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेने वाचले रेशनिंगचे धान्य, ६ लाखांचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 01:53 IST

Raigad News : कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ६२१ क्विंटल रेशनिंगचा ५ लाख ९७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. महसूल विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून याबाबत रेशन दुकानदार आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत : तालुक्यातील वेणगाव येथे असलेल्या रेशन दुकानातील ५००हून अधिक क्विंटल मालाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ६२१ क्विंटल रेशनिंगचा ५ लाख ९७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. महसूल विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून याबाबत रेशन दुकानदार आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वेणगाव येथे शासनाचे रास्त धान्य दुकान असून ते सुहास परशुराम तुपे यांच्या नावावर आहे. त्यांच्या वेणगाव गावातील रास्त धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ हे धान्य भेसळ करण्यासाठी तसेच चढ्या भावाने विक्री करण्यासाठी गोणी भरून नेले जाणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. रेशन दुकानदार तुपे हे आपले सहकारी संजय अग्रवाल आणि मंगेश गायकवाड यांच्या मदतीने गोण्या भरलेला माल वेणगावमधून लंपास करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात ६२१ क्विंटल माल गळाला लागला आणि मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी सापळा रचून पंचांच्या मदतीने ५७१ क्विंटल गहू आणि ५० क्विंटल तांदूळ असा माल अवैधरीतीने नेताना पकडला. यावेळी पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, कर्जतचे पोलीस निरीक्षक अरुण भोर, सहायक पोलीस निरीक्षक पाटील, अन्य कर्मचारी यांच्या मदतीने छापा मारून अवैध मार्गे जाताना थांबविण्यात यश आले. 

रास्त धान्य दुकानातील धान्याच्या अवैध वाहतुकीचा साधारण ५ लाख ९७ हजारांचा साठा जप्त केल्यानंतर कर्जत पोलिसांकडून महसूल विभागातील पुरवठा विभागाला बोलावून घेतले. त्यानंतर महसूल विभागाच्या पुरवठा शाखेचे निरीक्षक सोपान रामकृष्ण बाचकर हे तेथे पोहोचले आणि त्यांनी अवैध वाहतूक करण्यात येत असलेला माल रेशन दुकानात रेशनकार्डधारक यांना देण्यासाठी आणला होता हे मान्य केले.रेशन दुकानदार सुहास परशुराम तुपे, संजय अग्रवाल आणि मंगेश गायकवाड यांच्यावर सरकारी धान्याची अवैधरीत्या वाहतूक करणे, भेसळ करण्यासाठी धान्याची चोरी करणे, बाजारात चढ्या भावाने विक्री करण्यासाठी अवैधरीत्या माल उचलणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. या तिघांवर कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Raigadरायगड