रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 04:28 AM2018-09-16T04:28:39+5:302018-09-16T04:29:17+5:30

रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात

Ransai shirali, ghosali directly in Mumbai | रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

रानसईतील शिराळी, घोसाळी थेट मुंबईत

googlenewsNext

उरण : तालुक्यातील रानसई, विंधणे, चिरनेर, दिघोडे, गावातील शेतकरी रानसई धरणाच्या कुशीत पिकवत असलेल्या शिराळी, दुधी, घोसाळी, पडवळ, काकडी, डेटी आदी चविष्ठ भाज्यांना गणेशोत्सवात मुंबईतून मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे रानसईच्या डोंगरातील भाजीपाला आता थेट मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात पोहोचू लागला आहे.
उरण तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण आहे. या परिसरातील पडीक जमिनीवर रानसई गावातील आदिवासी बांधवांनी, तसेच विंधणे, चिरनेर, दिघोडे गावातील शेतकऱ्यांनी गेली २५ वर्षे या पडीक जमिनीवर मशागत करण्यास सुरुवात केली. मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड दिल्याने दिवसाला १० ते १५ हजार किलो भाजी येथील शेतकरी पिकवत आहेत. पिकवलेली भाजी चार-पाच कि.मी. अंतर पायी पार करून पनवेल, वाशी आणि मुंबईच्या बाजारात पोहोचवतात.
रानसई धरणाच्या परिसरातील पडीक जमिनीकडे नजर टाकली, तर शिराळी, घोसाळी, कारली, दुधी, काकडी यांसारख्या इतर भाज्यांच्या रांगा तांबड्या मातीत फुललेल्या दिसतात. त्यात डेटी, भाज्या यांची रोपे डोलताना दिसतात. रानसई, विंधणे, चिरनेर येथील शेतकºयांच्या जमिनी शासनाने रानसई धराणाच्या उभारणीसाठी १९७० साली संपादित केल्या, त्यानंतर शेतकरी, प्रकल्पग्रस्त नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही, त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते रानसईच्या पडीक जमिनीवर गेली २५ ते ३० वर्षे भाजीपाल्याचे, तसेच वाल, चवळी, पावटा, मूग या कडधान्यांचे उत्पन्न घेत आहेत.

३० हजार किलो भाजी
भाजीपाला चविष्ठ असल्याने मुंबईतून भाजीला मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकरी २० ते ३० हजार किलो भाजी मार्केटमध्ये पाठवत असतात; परंतु पावसाच्या लहरीपणामुळे भाजीचे उत्पन्न काही वेळा घटत आहे. या भाजीच्या मळ्यांद्वारे ३० कुटुंबे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.
शासनाने, कुषी विभागाने शेतकºयांना सहकार्य केले, तर अंगमेहनतीतून भाजीच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल, असा विश्वास या शेतकºयांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Ransai shirali, ghosali directly in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.