रायगड जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

By Admin | Updated: July 8, 2016 03:43 IST2016-07-08T03:43:26+5:302016-07-08T03:43:26+5:30

मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना असलेल्या रमजानमधील ईद गुरु वारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Ramadan Id in the Raigad district | रायगड जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

रायगड जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

दासगाव/ महाड : मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना असलेल्या रमजानमधील ईद गुरु वारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
रमजान हा पवित्र असा महिना आहे. या महिन्यातील तीस दिवस मुस्लीम बांधवांनी रोजे पकडून आत्मशुद्धी करून घेतली आहे. रोजे धरणारी व्यक्ती कर्तृत्वाच्या शुद्धीमुळे महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे ही ईद गुरु वारी सर्वत्र जल्लोषात साजरी करण्यात आली. रमजान ईद साजरी करताना मुस्लीम बांधवांनी पहाटेच नमाज अदा करत परवरदिगाचे आभार मानले. नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. महाड तालुक्यातील बहुतांश भागात मोहल्ल्यातून गुरु वारी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. नवनवीन कपडे आणि शुभेच्छांचा वर्षाव दिसून येत होता. महाड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी देखील दासगावमध्ये जावून पुष्पगुच्छ देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)

Web Title: Ramadan Id in the Raigad district