राजस्थानचे कारागीर रायगडमध्ये
By Admin | Updated: September 1, 2015 04:38 IST2015-09-01T04:38:28+5:302015-09-01T04:38:28+5:30
बाप्पाचे आगमन लवकरच होणार असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे ढोल, ताशे, ढोलकी आदी वाद्ये बनविणारे कारागीर कामात दंग असल्याचे पहावयास मिळते.

राजस्थानचे कारागीर रायगडमध्ये
अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडला
बाप्पाचे आगमन लवकरच होणार असून बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे ढोल, ताशे, ढोलकी आदी वाद्ये बनविणारे कारागीर कामात दंग असल्याचे पहावयास मिळते. गणेशोत्सव जवळ आल्याने राजस्थान येथून आलेले हे कारागीर घरोघरी तसेच गणेश मंडळांकडे जाऊन ढोलकी विक्री करीत आहेत.
वाद्याच्या तालावर महाराष्ट्रामधील लोककला जिवंत आहे. गणेशोत्सवात सर्वात जास्त महत्त्व हे ढोल-ताशाला आहे. या ढोल-ताशांच्या गजरातच बाप्पाचे स्वागत केले जाते. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये ढोल-ताशाला भरघोस मागणी असते. यंदा ढोल-ताशांची विक्री चांगली झाली असून मागणी वाढली असल्याची माहिती मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे जयपूर (राजस्थान) येथून आलेले महमद रईस यांनी दिली. ते म्हणाले की, ढोलकीसाठी आवश्यक असणारे ढोलक हे उत्तर प्रदेशमधील कानपूर, सुलतानपूर येथून येतात तर ढोलकीसाठी लागणारे चामडे उत्तर प्रदेशमधील मेरठ येथून आणले जाते तर मेणबत्तीचे मेण फासून त्यावर दिलेल्या रंगावर चमक दिली जाते. अशा प्रकारच्या लहान ते मोठ्या ढोलक्या ते बनवीत असतात.२०० रुपयांपासून १२५० पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या ढोलक्या उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. गणपतीनंतर ही मंडळी गोव्याला जातात. येथून नवरात्रोत्सवासाठी गुजरात राज्यात जातात. (वार्ताहर)