शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इथे पैसे भरा आणि मरा; राज ठाकरेंचं पुन्हा 'मिशन टोल नाका', थेट गडकरींना केला फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 13:21 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरेंनी सरकारवर टीका केली.

पनवेल- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पनवेल येथे निर्धार मेळावा होत आहे. या मेळाळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी भाजपसह सर्व पक्षांना टोला लगावला. या मेळाव्यात त्यांनी पुन्हा एकदा टोल नाक्यावरुन सरकारवर टिकास्त्र सोडले. 

रोहितकडे नेतृत्व म्हणून पाहते, तो बोलायला लागला की आबा बोलतात असं वाटतं; सुप्रिया सुळेंनी केलं कौतुक

राज ठाकरे म्हणाले, समृद्धी महामार्गाला फेन्सिंग टाकलेले नाहीत. त्या महामार्गावर बकरी, हरणे, गुरे येतात. अचानक गाडीच्या आडवी जणावरे आली तर करायचे काय. त्या महामार्गावर आतापर्यंत साडेतीनशे माणसे मृत्यूमुखी पडली आहेत. आम्ही फेन्सिंग लावणार नाही पण टोल लावणार. इथे पैसे भरा आणि मरा, अशी सरकारे असतात का?, असा सवालही ठाकरे यांनी केला.

मुंबई-गोवा महामार्गासाठी नितीन गडकरींना फोन केला

"राज्यात कुठे जायचे झाले की, युटर्न मारून जावे लागते. मुंबई गोवा महामार्गावर १५,५६६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. रस्ता झालेला नाही. बाकीच्यांच्या तुंबड्या भरल्या. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितले की, मी लक्ष घातले पण कंत्राटदार पळून गेले, काही कोर्टात गेलेत. यामागे कोणाचे काही काम तर सुरू नाही ना, असंही राज ठाकरे म्हणाले.  कोकणातील जमिनी आहेत त्या धडाधड परप्रांतीयांच्या घशात गेल्या आहेत. नाणार रद्द होतोय हे पाहून बारसू सुरु झाले. भोळसट कोकणी बांधव चिरीमिरीसाठी जमीनी विकून मोकळा होतोय. पाच हजारात एकर जमिन कधी एकत्र पाहिलीय का? कुंपणच शेत खातेय,असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. 

कोकणातील महामार्गाचे काम गडकरी आणि मुख्यमंत्र्यांनी २०२४ पर्यंत लोकांसाठी खुला होईल असे सांगितले आहे. पण आताच्या गणपतीचे काय? आतापर्यंत मृत्यूमुखी झालेल्यांचे काय? अडीज हजार लोकांचे जीव गेलेत. गावी, फिरायला गेलो होतो आणि जीव गेले. सगळे ढिम्म आहेत. एकमेव कारण आहे, आम्ही काहीही केले, कसलेही रस्ते दिले तरी एका कोणत्यातरी विषयावर ही लोक मतदान करणार, हा धंदा आहे. एखादा रस्ता पुढच्या २५-३० वर्षांसाठी चांगला केला तर पैसे खायचे कसे. तो सहा महिन्यात खराब झाला पाहिजे. नवीन टेंडर नवीन पैसे, नवीन कंत्राट नवीन टक्के. खोके खोके असे ओरडतायत ना त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविडपण सोडला नाही त्यांनी, अशी टीकाही राज ठाकरे यांनी केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे