जिल्ह्यात पावसाने पुन्हा धरला जोर
By Admin | Updated: July 24, 2015 03:22 IST2015-07-24T03:22:56+5:302015-07-24T03:22:56+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाचे केंद्र सावंतवाडी

जिल्ह्यात पावसाने पुन्हा धरला जोर
अलिबाग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये गुरुवारी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाचे केंद्र सावंतवाडी तालुक्यातील कोनाळकट्टा गावापासून ४० किमी अंतरावर आहे. भूकंपाची तीव्रता ३ रिस्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंप केंद्र कोयना नगरपासून १४०.४० किमी अंतरावर असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
भूकंपाचे पूर्वानुमान वा अंदाज सांगता येत नाही. तरी या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर हळूहळू वाढत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ११५४.२९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.