शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
3
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
4
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
5
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
6
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
7
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
8
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
9
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
10
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
11
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
12
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
13
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
14
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
15
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
16
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
17
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
18
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
19
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
20
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात

रानसई धरणाची पातळी खालावली, उरणकरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 02:28 IST

उरण तालुक्यातील सव्वा लाख लोकसंख्येच्या २६ ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या रानसई धरणाची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे.

- मधुकर ठाकूरउरण : उरण तालुक्यातील सव्वा लाख लोकसंख्येच्या २६ ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या रानसई धरणाची पातळी प्रचंड प्रमाणात खालावली आहे. धरणात २० मेपर्यंत पुरेल इतकाच पाण्याचा साठा शिल्लक आहे. १० दिवसांचाच पाण्याचा साठा शिल्लक असल्याने उरण तालुक्यातील नागरिकांवर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच रानसई सहा आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईने ग्रासले असून त्यापैकी दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून टंचाईग्रस्त चिरनेर येथील दोन वाड्यांसाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी के लीअसल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी दिली.फे ब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईने ग्रासले आहे. चाणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंजा गावात बारा पाडे असून गेल्या ३३ वर्षांपासून टंचाईने त्रस्त आहेत. गावातील नागरिकांना पाण्यासाठी १५ ते २० दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. १५ ते २० दिवसांनंतरही फक्त एक तास मिळणारे पाणी अपुरे आणि दूषित असते. आलेले पाणी १५ दिवस पुरविण्यासाठी ड्रम, टाक्यामध्ये जमा करून ठेवले जाते. मात्र इतक्या दिवस साठवून ठेवण्यात आलेल्या पाण्यात जंतू, किडे जमा होतात. त्यामुळे साठवणूक केलेले पाणी दूषित होते. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सरकार दरबारी उंबरठे झिजवून आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे करंजा येथील पाड्यांचा पाणीप्रश्न सुटला नाही. यामुळे कोंढरीपाडा येथील नागरिकांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त केला होता, अशी माहिती येथील ग्रामस्थ विनायक पाटील यांनी दिली. तर करंजा गावातील पाणीटंचाई दूर करण्यात यावी, यासाठी जनवादी महिला संघटनेने उरण तहसीलदार कल्पना गोडे आणि गटविकास अधिकारी नीलम गाडे यांना भेट घेऊन निवेदन दिल्याची माहिती संजय ठाकूर यांनी दिली.सुमारे १०-१२ हजार लोकसंख्या असलेल्या केगाव ग्रा.पं.तील गावांनाही पाणीटंचाईने ग्रासले आहे. परिसरातील विहिरी, तलाव आणि बोअरवेल यांनी तळ गाठल्याने महिलांवर दूरवर जाऊन मिळेल तेथून पाणी आणावे लागत आहे. याआधी दोन दिवसाआड मिळणारे पाणी ६-७ दिवसानंतरही मिळेल क ी नाही याची शाश्वती राहिली नाही. पाण्याअभावी लग्न समारंभाबरोबरच आणि इतर कार्यक्रमांनाही फाटा देण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. तसेच पाणीटंचाईच्या काळात लग्न जुळून आलीच तर त्या लग्नसराईसाठी सिलबंद बाटल्यांचे महागडे पाणी विकत घेण्याची पाळी यजमानांवर येते. एमआयडीसीकडूनच पुरेशा प्रमाणात, पुरेशा दाबाने आणि नियमित मागणीनुसार पाणीपुरवठा होत नसल्यानेच केगाववासीयांवर पाणीटंचाईचे सावट आल्याचे केगाव सरपंच राजेंद्र ठाकूर यांनी दिली. त्याशिवाय थेट विद्युत पंप लावून पाणी चोरी होत असल्याने पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. केगावसाठी सध्या अडीच इंचाची असलेली पाइपलाइन सहा इंचापर्यंत वाढविण्यात यावी, याबाबत एमआयडीसी,लोकप्रतिनिधी, आमदार, खासदारांनाही साकडे घातले आहे. मात्र, त्यानंतरही मागणीकडे दुर्लक्षच होत असल्याने पाणीप्रश्न निकाली निघालेला नाही. मात्र, ग्रामपंचायत आणि एमआयडीसी परस्परांकडे बोटे दाखवून वेळ मारून नेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातआहे.चिरनेर परिसरात अनेक गावांना सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होत आहे. हेटवणे धरणातून पाणीपुरवठा होणाºया जलवाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये बिल्डर्स आणि टँकरमाफिया अधिक सक्रिय आहेत. या पाणी चोरीमध्ये सिडकोचे काही अधिकारीही सामील आहेत. आर्थिक फायद्यासाठी नागरिकांचे पाणी लांबविणाºया या अनधिकृत लॉबीमुळे चिरनेर परिसरातील काही गावांनाही येत्या काही दिवसात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतील, अशी स्थिती आहे. राजिपच्या पुनाडे धरणातून उरण तालुक्यातील पूर्व भागातील पिरकोन, आवरे, सारडे, वशेणी, पाले, गोवठणे आदी दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पुनाडे धरणाचीही पाण्याची पातळी खालावल्याने पुढील काही दिवसात या दहा गावांनाही पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नागरिकांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सध्या सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज सात एमएलडी पाणी घेतले जात असल्याची माहिती एमआयडीसी उरण विभागाचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली. आठवड्यातील मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस पाणीपुरवठा खंडित करण्यात येत आहे.रानसईच्या सहा आदिवासी पाड्यांपैकी खैराची वाडी आणि भुºयाची वाडी अशा दोन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तर चिरनेर परिसरातील दोन वाड्यांची पाणीटंचाईची तक्रार असून त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली असल्याची माहिती उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी दिली. याव्यतिरिक्त तक्रार नसल्याचा दावा उरण पं. समितीकडून केला जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई