चौल -रेवदंड्यात मेघगर्जनांसह पाऊस

By Admin | Updated: June 12, 2016 01:00 IST2016-06-12T01:00:14+5:302016-06-12T01:00:14+5:30

चौल-रेवदंडा परिसरात पहाटे मेघगर्जनांसह मान्सून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा व नागरिक सुखावले आहेत. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला आहे.

Rainfall with thunderstorms | चौल -रेवदंड्यात मेघगर्जनांसह पाऊस

चौल -रेवदंड्यात मेघगर्जनांसह पाऊस

रेवदंडा : चौल-रेवदंडा परिसरात पहाटे मेघगर्जनांसह मान्सून पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा व नागरिक सुखावले आहेत. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाने दिलासा मिळाला आहे.
बळीराजा मोठ्या संख्येने शेतात उतरलेला दिसत असून, बाजारात विविध बी-बियाणे यांची खरेदी करण्यासाठी बळीराजा दिसत आहे. काही वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसाच्या हजेरीने येथील हायस्कूल ते पारनाकादरम्यानच्या मुख्य रस्त्याची दैना उडाली आहे. पादचारी वाहनचालकांना चिखलातून जावे लागत आहे.
पहाटेच पावसाने हजेरी लावल्याने दिवसभर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. गेल्या चार महिन्यापासून उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. (वार्ताहर)

Web Title: Rainfall with thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.