शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 23:51 IST

नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळणा-या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळीही वाढली आहे. त्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.नवी मुंबई शहराला मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणातून दिवसाला ४३0 एमएलडी इतके पाणी पुरविले जाते. या वर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे महापालिकेने शहरात दहा टक्के पाणी कपात जाहीर केली. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे जोरदार अगमन झाले. आठ दहा दिवस धो धो कोसळलेल्या पावसामुळे मोरबे धरणाच्या पातळीत काही प्रमाणात वाढ झाली. मात्र, त्यानंतर जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारली. असे असले, तरी शेवटच्या आठवड्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. मागील तीन दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवार सकाळी ८.३0 ते शनिवार ८.३0 या चोवीस तासात धरण क्षेत्रात ३३0 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाची पातळी जवळपास दोन मीटरने वाढली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. सध्या ही पातळी ८१.७0 मीटरपर्यंत पोहोचली आहे. २५ जुलै रोजी ही पातळी ७९.४५ मीटर इतकी होती. पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण भरायला वेळ लागणार नाही, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता ८८ मीटर इतकी आहे. ही पातळी गाठण्यासाठी सरासरी ३000 मीमी पावसाची गरज असते. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपर्यंत २0१७.६0 मीमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरण भरण्यासाठी आणखी साधारण १000 मीमी पावसाची गरज आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई