शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

पावसाने जिल्ह्याला झोडपले, माथेरान घाटामध्ये दरड कोसळल्याने चार तास वाहतूक ठप्प  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:46 IST

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

अलिबाग - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील सावित्री, गाढी, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सततच्या पावसामुळे माथेरान घाटामध्ये दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीच हानी झाली नाही. मात्र, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला याबाबतची माहिती मिळताच तेथे तातडीने संबंधित यंत्रणांच्या मदतीने रस्त्यात पडलेली दरड हटवण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती विभागाचे सागर पाठक यांनी सांगितले.पेण तालुक्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये १३३८ मि.मी. पावसाची नोंद झाली, तसेच रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे पेण तालुक्यातील तळवली येथील गंगाराम वाघमारे आणि रामा पवार यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे निगडेवाडी येथील श्रावण पवार यांच्याही घराचे नुकसान झाले. आंबेघर येथील समाजमंदिरालाही पावसाचा फटका बसल्याने नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती पेण तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी शनिवारी धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र, रविवारी त्यामध्ये घट झाल्याचे दिसून आले. ही आकडेवारी दुपारी १ वाजेपर्यंतची आहे.किनारी गावांना सतर्कतेचा इशारासोमवार ९ जुलैपर्यंत धुवाधार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सुमारे ७ ते २४ से.मी. पावसाची शक्यता असल्याने नदी, किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. या कालावधीत समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी न जाण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.२४ तासांमध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील पर्जन्यमानअलिबाग ३७ मि.मी., पेण-८० मि.मी.,मुरु ड-९८ मि.मी., पनवेल-१३५.२० मि.मी., उरण-२२ मि.मी., कर्जत-२३१.४० मि.मी., खालापूर-२२१ मि.मी., माणगाव-२५० मि.मी., रोहा-८१ मि.मी., सुधागड-११५ मि.मी., तळा-१७१ मि.मी., महाड-२४४ मि.मी., पोलादपूर-१४० मि.मी., म्हसळा-१४२.८० मि.मी., श्रीवर्धन-५० मि.मी., माथेरान-११० मि.मी.माणगाव येथे सर्वाधिक २५० मि.मी.रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १३३.०९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे, तसेच १ जूनपासून रविवारपर्यंत सरासरी १३८६.२९ मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.कालवा फुटल्याने माणगाव शहरात शिरले पुराचे पाणीर्माणगाव : माणगावच्या काळनदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील काही भागांत नदीचे पाणी शिरले असून, माणगावचा उतेखोल येथील कालवा फुटल्याने परिसरातील घरात पाणी शिरले.नदीपासून काही अंतरावर असलेल्या निकम स्कूल, माणगाव कोर्ट व विश्रामगृह तसेच अनेक इमारतींच्या परिसरात पाणी साचले आहे. तसेच कचेरी रोडवरील रेल्वे ब्रिज खाली पाणी शिरले.काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे कालवा फुटून माणगावमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती, त्या वेळी आपत्कालीन यंत्रणा कामी आली व लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले होते, त्या वेळीही घरात पाणी शिरले होते. आज नदीचे पाणी पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. कालवा काळप्रकल्प संबंधित पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी असलेली गळती बंद केली असती तर कालवा फुटला नसता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. उतेखोल कालवा पूल (सायपन) अत्यंत धोकादायक झाला आहे.जनजीवन विस्कळीतमुरु ड जंजिरा : मुरुड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शहर, तसेच ग्रामीण भागात ठिकठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रायगड जिल्ह्यात शनिवार सर्वच धुवाधार पाऊस पडला; परंतु याला मुरुड तालुका मात्र अपवाद राहिला. येथे ९८ मिलीमीटर एवढा पाऊस बरसला. रविवारी मात्र पावसाचा जोर वाढल्याने भाजी मार्केट व मासळी मार्केटमधील गर्दी ओसरून येथे शुकशुकाट पाहायला मिळाला.शहरातील गोलबंगला, मारु ती नाका, बाजारपेठ आदी सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. खारआंबोली ग्रामपंचायत हद्दीत एका घराचे पावसामुळे किरकोळ नुकसान असून, याबाबत पंचनामा करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी आहे.मुरुड तालुक्यात आतापर्यंत १३६४ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाºया पावसामुळे पर्यटकांची संख्या येथे रोडावली आहे.समुद्रकिनारे सामसूम होते. हॉटेल व लॉजिंगचा व्यवसायसुद्धा मंदावला आहे. ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला १५ आॅगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. संततधार पावसामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गाड्या खूप उशिराने मुरु ड आगारात परतत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासात दीड तासांचा विलंब सहन करावा लागत आहे. पावसाच्या रिपरिपमुळे होड्या समुद्रात न गेल्याने सध्या मासळी बाजारात मासळीचा तुटवडा जाणवला.

टॅग्स :MatheranमाथेरानRainपाऊसRaigadरायगड