कर्जत - एलटीटी-चेन्नई एक्स्प्रेसच्या कर्जतकडे येणाऱ्या पहिल्या जनरल डब्यातून शुक्रवारी, १८ एप्रिलला एक इसम २९ लहान मुलांसह संशयास्पद परिस्थितीत प्रवास करत असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी कारवाई करत बालकांची सुटका केली, तसेच मोहम्मद जलालउद्दीन मोहम्मद फिदा हुसैन सिद्दीकी (२८) याला ताब्यात घेतले असून, तो मदरसा शिक्षक आहे.
माजी मनसे रायगड जिल्हा सचिव, शिवसेना नेत्या आकांक्षा रांकित शर्मा-सावंत, त्यांच्या सहकारी सेजल नागावकर यांनी ही बाब रेल्वे जीआरपीच्या १५१२ या हेल्पलाइन क्रमांकावर कळवली होती.
डब्यात तपासणीकर्जत रेल्वे स्थानकात चेन्नई एक्स्प्रेस आल्यानंतर पोलिसांनी २९ लहान मुले, त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला खाली उतरवले. त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व मुले त्याच्या नातेवाइकांची असून, कर्नाटकातील रायचूर येथील मदरशामध्ये कुराण व उर्दू शिक्षणासाठी नेण्यात येत होती.
तत्काळ नातेवाइकांशी संपर्कसर्व २९ बालकांना वैद्यकीय तपासणी करून बालगृह कर्जत येथे ठेवण्यात आले आहे. रवींद्र शिसवे (पोलिस आयुक्त लोहमार्ग मुंबई), मनोज पाटील (उपायुक्त मध्य परिमंडळ लोहमार्ग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी खाडे, पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई केली.