शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

रायगडचा ‘बल्क ड्रग पार्क’ राज्य सरकारच उभारणार - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 05:58 IST

साडेतीन हजार कोटींची तरतूद करणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  औषध निर्मितीसाठी रायगडमधील नियोजित बल्क ड्रग पार्क (बीडीपी) हा प्रकल्प  महाविकास  आघाडी  सरकारच्या नाकर्तेपणामुळे रेंगाळला. त्याबाबत केंद्र सरकारकडून निधी मिळो अथवा न मिळाे राज्य सरकार हा प्रकल्प बनविण्यासाठी  जमीन हस्तांतरणासह आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता करणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.  

जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सहा महिन्यांपासून रखडलेली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बल्क ड्रग पार्क प्रकल्पाबाबत विरोधकांकडून सरकारवर  जाणीवपूर्वक खापर फोडले जात आहे. वास्तविक वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाप्रमाणे याच्या विलंबालाही तेच जबाबदार आहेत.  आपल्याप्रमाणेच गुजरात व हिमाचल प्रदेशनेही प्रयत्न सुरू केले होते. मात्र, राज्य सरकारने त्यानंतर जागा निश्चिती व हस्तांतरण करण्यामध्ये दिरंगाई केली. अन्य राज्यांनी त्याबाबत आघाडी घेतल्याने केंद्राने त्यांना मंजुरी दिली आहे. मात्र, राज्यातही तो राबविला जाऊ शकतो.  राज्य सरकार व औद्योगिक विकास महामंडळाकडून त्यासाठीची पूर्तता केली जाईल.आंबेत पुलाच्या कामाची चौकशीरत्नागिरी- रायगड  यांना जोडणाऱ्या  आंबेत पुलाचे बांधकाम निकृष्ट केल्याबाबत चौकशी करून  संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे याठिकाणी बोटीद्वारे एसटी बस नेण्यासाठी पाहणी करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्यया प्रकल्पासाठीच्या जागेवर नवाबाचे वंशज व स्थानिकांसाठीच्या दर निश्चितीबाबत भूमिपुत्रांमध्ये नाराजी आहे. नवाबांच्या वंशजांबाबत स्पष्टता येत नसल्याने त्याऐवजी सर्व मोबदला स्थानिकांनाच द्यावा,  अशी त्यांची मागणी आहे, त्यादृष्टीने लवकर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. जमीन व इन्फास्ट्रक्चर उभारण्यासाठी लागणाऱ्या साडेतीन हजार कोटी निधीची राज्य सरकारकडून तरतूद केली जाईल. नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सरकार आग्रही असणार आहे.    - उदय सामंत, उद्याेगमंत्री

टॅग्स :Uday Samantउदय सामंत