शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रायगडचे २४ किनारे आपत्ती निवारणास सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 04:28 IST

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक साधने तैनात

- जयंत धुळप अलिबाग: जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मदत व बचाव कार्यासाठी तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी साहाय्यभूत ठरणारी आधुनिक साधने जिल्ह्यातील २४ समुद्रकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहेत. याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.रायगडच्या समुद्रकिनारी राज्या-परराज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. अनेकदा समुद्राच्या भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने जीवावर बेतणारे प्रसंग या किनाºयावर घडले आहेत. त्यातून पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटक सुरक्षा अभियानांतर्गत ७८ लाख रुपयांच्या निधीतून ही साधने आणण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारे संरक्षण यंत्रणा उभी करण्यात रायगड जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या आधुनिक साधनांची पाहणी करून माहिती घेतल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ही साधने तैनात केली आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, मांडवा, आक्षी, नागाव, किहीम, रेवदंडा, कोर्ले, मुरुड- जंजिरा, जलदुर्ग, काशीद, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, सासवणे, आवास, थळ, वरसोली, रांजणपाडा डावली, मिळकतखार, कोप्रोली बोडणी, आदगाव, वेळास आगर, घारापुरी, नागाव पिरवाडी आदी २४ समुद्रकिनारी ही सुरक्षा साधने तैनात केली आहेत.परिणामी, येत्या काळात समुद्रात बुडण्याच्या दुर्घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. दरम्यान, समुद्रकिनारी येणाºया पर्यटकांनी आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी आपत्ती निवारण पथकास सहकार्य करावे, त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले गेले आहे.दोन टप्प्यांत साधनसामग्रीचे वितरणपहिल्या टप्प्यात मेगाफोन, दुर्बीण, टॉर्च, दोरखंड, लाइफ जॅकेट, फायबर स्ट्रेचर, स्कुबा ड्रायव्हिंग सेट, जीवरक्षक रिंग, सायरन, उलन ब्लँकेट, सर्चलाईट आदी साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर दुसºया टप्प्यात रेस्क्यू ट्यूब, रेस्कू कॅन, थ्रो बॅग, जीवरक्षकांसाठी पोषाख, सर्फ रेस्क्यू बोर्ड आदी सामुग्री उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच समुद्रकिनाºयांवर २५ जीवरक्षक नेमून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.मुरुडच्या दुर्घटनेनंतर पर्यटक सुरक्षा अभियानपुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांचा मुरुडच्या समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडू नये, यासाठी शासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेऊन जिल्ह्यातील समुद्रकिनाºयांवर मदत व बचावकार्यासाठी साहित्य पुरवण्याची घोषणा करण्यात आली होती.पर्यटकांच्या सुरक्षा तसेच बचावकार्यासाठी आवश्यक विविध ११ साधने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून संबंधित ग्रामपंचायती आणि नगरपालिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

टॅग्स :Raigadरायगड